‘शिवपुत्र संभाजी’ सिनेमाचं पोस्टर लाँच, संभाजी महाराजांवर सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

‘शिवपुत्र संभाजी’ सिनेमाचं पोस्टर लाँच, संभाजी महाराजांवर सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त दिग्दर्शक अजित शिरोळे आणि लेखक प्रताप गंगावणे यांनी ‘शिवपुत्र संभाजी’ या बहुभाषिक चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर लाँच केलं. या सिनेमाच्या पोस्टरने अगदी कमी वेळात प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे. बॉलिवूडमध्ये संजय लीला भन्साळी, आशुतोष गोवारीकर हे ऐतिहासिक चित्रपटांसाठी ओळखले जातात आणि आता दिग्दर्शक अजित शिरोळे यांनी हे ऐतिहासिक चित्रपटाचे शिवधनुष्य पेलले आहे. १३ यशस्वी मराठी सिनेमा अजित शिरोळे यांनी दिग्दर्शित केले आहेत. आनंद पिंपळकर यांचा ‘आलंय माझ्या राशीला’ हा हिट सिनेमा अजित शिरोळे यांनी दिग्दर्शित केला होता. आता अजित शिरोळे ‘शिवपुत्र संभाजी’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झालेत.

शिवानी मूव्हीज आणि धनराज प्रॉडक्शनच्या संयुक्त निर्मितीतून ‘शिवपुत्र संभाजी’ हा सिनेमा भेटीला येतोय. हा सिनेमा ४ भाषेत प्रदर्शित होणार आहे. शंभरहून अधिक सिनेमांचे लेखक, तसेच राजा शिवछत्रपती, स्वराज्यरक्षक संभाजी, स्वराज्य जननी जिजामाता, बाजीराव मस्तानी अशा ऐतिहासिक मालिकेचे लेखक प्रताप गंगावणे यांनी हा सिनेमा लिहिला आहे. लॉकडाऊन संपल्यावर दिग्दर्शक अजित सिनेमाचं शूटिंग सुरू करणार आहेत. रायगड, तुळापूर आणि संगमेश्वर अशा संभाजी महाराजांशी निगडीत रिअल लोकेशनवर शूटिंग होणार आहे. तसंच सिनेमाच्या कलाकारांची नावंही लवकरच जाहीर होणार आहेत.


हे वाचा-  ‘ब्रोकन बट ब्यूटीफुल 3’ वेबसिरिजचा टीजर प्रदर्शित!!

First Published on: May 14, 2021 3:40 PM
Exit mobile version