प्रेग्नेंट सना खानला पतीने भर पार्टीतून नेलं ओढून; नेटकऱ्यांचा संताप

प्रेग्नेंट सना खानला पतीने भर पार्टीतून नेलं ओढून; नेटकऱ्यांचा संताप

बॉलिवूडमध्ये बाबा सिद्दीकी आणि जीशान सिद्दीकी यांची इफ्तार पार्टी खूप प्रसिद्ध आहे. ज्यात बॉलिवूड कालाकार आवर्जून हजेरी लावतात. रविवार संध्याकाळी बाबा सिद्दीकीने इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. बाबा सिद्दीकी प्रत्येक वर्षी जंगी इफ्तार पार्टी ठेवतात. ज्यात बॉलिवूडमधील अनेक कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. सध्या सोशल मीडियावर या पार्टीतील अनेक व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत आहेत. मात्र, एका व्हिडिओ सध्या सर्वांच लक्ष वेधून घेतलं आहे ज्यावर नेटकरी संताप व्यक्त करत आहेत.

खरं तर, बाबा सिद्दिकीच्या इफ्तार पार्टीमध्ये बॉलिवूड अभिनेत्री आणि बिग बॉस फेम सना खान आणि तिचा पती अनस सईद देखील उपस्थित होते. यादरम्यानचा त्यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. समोर आलेल्या या व्हिडिओमध्ये पार्टीमध्ये जात असताना गर्भवती सना खानचा पती अनस तिचा हात पकडून जोरात तिला खेचताना दिसत आहे. यावेळी सना त्याला मी थकलेय त्यामुळे पटापट चालू शकत नाही असं म्हणते. त्यावेळी त्याने तिचा हात झटकला आणि तो एकटाच पुढे निघून गेला.

 


हेही वाचा :

अभिमानास्पद! आर माधवनचा मुलगा वेदांतची सुवर्ण कामगिरी; कोरलं पाच सुवर्णपदकांवर नाव

First Published on: April 17, 2023 9:57 AM
Exit mobile version