प्रिन्स आणि युविकाची केमिस्ट्री छोट्या पडद्यावर दिसणार

प्रिन्स आणि युविकाची केमिस्ट्री छोट्या पडद्यावर दिसणार

प्रिन्स नरूला आणि युविका चौधरी हे छोट्या पडद्यावरील कलाकार जोडपं पुन्हा एकदा मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एका रिअ‍ॅलिटी शोमधून त्यांच्या प्रेमकहाणीला सुरुवात झाली. या सुंदरशा कहाणीनंतर हे जोडपं लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. मात्र त्या आधी अँड टीव्हीवरील ‘लाल इश्क’ या मालिकेत प्रिन्स आणि युविकाची केमिस्ट्री पुन्हा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

खर्या आयुष्यातील हे प्रेमीयुगुल प्रतीक शर्मा (एलएसडी फिल्म्स) निर्मित या मालिकेतील एका भागात प्रमुख पात्रं रंगवणार आहेत. परंतु या भागाची कहाणी त्यांच्या खर्या आयुष्यातील प्रेमकहाणीपेक्षा अगदी वेगळी आहे. सुपरनॅचरल गोष्टींचा शोध घेत जाणारी ही कथा आर्यन (प्रिन्स) आणि शिखा (युविका)च्या सुंदर लग्नाची कहाणी उलगडते.

ज्याच्यावर प्रेम आहे त्याच्याबरोबर पहिल्यांदाच काम करण्याबद्दल युविका बोलत होती, ‘प्रिन्स आणि मी एकत्र पडद्यावर यावं अशी अनेक चाहत्यांची इच्छा होती आणि लाल इश्कने इतक्या चांगल्या कथेद्वारे ती संधी आम्हाला दिली. कथा किंवा माझ्या पात्राबद्दल काही शंकाच नव्हती, त्यामुळे कथा सोडण्याचा प्रश्नच नव्हता, शिवाय प्रेक्षकांसाठी हा उत्तम भाग असणार आहे, अशी माझी खात्री आहे.’ तर प्रिन्स म्हणाला की, ‘लाल इश्कमध्ये एकत्र काम करतोय याबद्दल युवि आणि मी अतिशय उत्सुक आहोत, आमच्या चाहत्यांनाही आम्ही पडद्यावर एकत्र काम करावं असं वाटतच होतं. कथा अतिशय उत्साहवर्धक आणि अचानक वळण घेणारी असल्याने आम्हाला शूटिंग करताना खूपच मजा आली. आम्हा दोघांपैकी कुणी असं काम केलेलं नव्हतं, म्हणून आमचा उत्साह द्विगुणित झाला होता. या भागाबद्दलची प्रेक्षकांची प्रतिक्रिया बघण्यासाठी आता आम्ही उत्सुक आहोत. अर्थात, युविकाबरोबर रोमान्स करण्याची आणखी एक संधी यामुळे मला मिळाली आहे.’
—————– ———————- ————

First Published on: August 16, 2018 3:00 AM
Exit mobile version