प्रियाला मिळाला एक सुखद धक्का

प्रियाला मिळाला एक सुखद धक्का

प्रियाला मिळाला एक सुखद धक्का

कोरोना काळात सामान्य नागरिकांचे जीवन अगदी असह्य झाले होत.यातून कला क्षेत्रही वाचले नाही. अनेक चित्रपट नाटक, मालिका तयार असूनही प्रदर्शित करता आल्या नाहीत. परंतु आता कोरोनाचे सावट कमी होताचं कलाक्षेत्रात पुन्हा उत्साह पाहयला मिळत आहे. यातच मराठी अभिनेत्री प्रिया बापटला कोरोनानंतर एक सुखद धक्का बसला आहे. हा सुखद धक्का म्हणजे प्रियाच्या ‘दादा एक गुड न्यूज आहे’ या नाटकाच्या तिकिट खिडकीवरील हाऊसफु्ल्लची पाटी. प्रियाने हा आनंद एका मिनिट ४२ सेकंदाचा व्हिडिओतून व्यक्त केला आहे. यात व्हिडिओमध्ये प्रियाच्या चेहऱ्यावर मास्क असतानाही तिचा आनंद अगदी खुलून दिसत आहे.

 

या व्हिडिओमध्ये प्रिया आनंद व्यक्त करत सांगते, आम्ही बालगंधर्व नाट्यगृहा आलो आहोत. असे म्हणत ती तिकीट खिडकीवर उत्साहात फुलांचा हार चढवणाऱ्यांकडे व्हिडिओचा कॅंमेरा फिरवते. या व्हिडिओमध्ये तिकीट खिडकीवर हाऊसफुलचा बोर्ड झळकतोयं. यावेळी प्रियाच्या आवाजात खूप उल्हास जाणवतो आहे. विशेष बाब म्हणजे बालगंधर्वमध्ये नाटकाचे प्रयोग सुरु झाल्यापासून हाऊसफुल झालेलं ‘दादा एक गुड न्यूज’ हे पाहिलं नाटक ठरलं आहे. त्यानंतर या व्हिडिओमध्ये पुढे उमेश कामत सांगतो, नाटकाच्या हाऊसफुलचा बोर्ड आम्ही आमचं पुण्याचं बुकींग सांभाळणारे साथी जे आहेत त्यांच्या हातानं लावला आहे. हे बुकिंग करणारे उमेशच्या बाजूलाच उभे असलेले दिसतात. यावेळी उमेशने बालगंधर्व व्यवस्थापनेचे आभार करत म्हणाला. ‘आता आम्ही सगळे खूप मनापासून, चोख प्रयोग करू’ असं उमेश म्हणतो आहे. यावेळी सगळ्यांनी टाळ्या वाजवत आनंद व्यक्त केला. यावेळचे अनेक अनुभव प्रिया व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करत आहे. व्हिडीओला इन्स्टाग्रामवर भरभरून लाईक्स आणि कमेंट्स व्यक्त होत आहे.

First Published on: January 18, 2021 11:17 AM
Exit mobile version