प्रियांका-निकचे Wedding Photos १८ कोटींना?

प्रियांका-निकचे Wedding Photos १८ कोटींना?

प्रियांका चोप्रा आणि निक जोनास

बॉलीवूडमध्ये सध्या लगीनघाई सुरू आहे. रणवीर – दीपिका १४-१५ नोव्हेंबरला इटलीमध्ये लग्न करणार आहेत. तसेच प्रियंका चोप्रा आणि निक जोन्स देखील आत्ता २ डिसेंबरला लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत.

पीसी आणि निकचे लग्न जोधपूर मधील मेहरानगड येथे होणार आहे. दोघांच्या लग्नाचे फोटो आंतरराष्ट्रीय प्रकाशनात येणार आहेत अशी बातमी सुत्रांकडून मिळाली होती. मात्र आत्ता प्रियंका आणि निकचे फोटो १८ कोटी रुपयांना विकले गेले असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र कोणत्या मासिकानं त्यांचे फोटो विकत घेतले आहेत हे अद्याप कळू शकलेलं नाही.

निक आणि प्रियंकाचा विवाह सोहळा तीन दिवसांचा असणार आहे. ३० नोव्हेंबरपासून सर्व सोहळ्यांना सुरूवात होणार आहेत. जवळपास १५०० ते २००० पाहुणे निक-प्रियंकाच्या विवाहामध्ये उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. चित्रपट सृष्टीतून सलमान खान आणि त्याचे कुटुंब, रणबीर कपूर, आलिया भट्ट, कॅटरीना कैफ, फरहान अख्तर आणि सिद्धार्थ रॉय कपूर यांना आमंत्रित केले गेले आहे.

रणवीर आणि दीपिका सारखेच पीसी-निक सुध्दा एकमेकांच्या संस्कृतीचा सन्मान करण्यासाठी दोन पध्दतीने  विवाह सोहळा पार पडणार आहे. संगीताची तयारी आधीच सुरू झाली आहे. तर दुसरीकडे, प्रियांका निकसाठी गाणं गाणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे.


दोघांच्या नात्याबद्दल खूप महिन्यांपासून चर्चा सुरू होती. दोघे एकत्र सर्वप्रथम MET Galaला दिसले होते. तिथून त्यांच्या लग्नाबाबत चर्चा सुरू झाली होती. पण १८ ऑगस्ट रोजी पारंपारिक पध्दतीने त्यांचा रोका पार पडला.
काही दिवसांपूर्वीच अॅमस्टरडॅममध्ये प्रियंकाची बॅचलरेट पार्टी जोरात रंगली.

First Published on: November 13, 2018 10:24 AM
Exit mobile version