माँ आनंद शीलाची भूमिका साकारणार प्रियांका चोप्रा.

माँ आनंद शीलाची भूमिका साकारणार प्रियांका चोप्रा.

पुन्हा एकदा हॉलीवूड- मा आनंद शीला

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा ही आता एक ग्लोबल अभिनेत्री बनली आहे. प्रियांकाने २०१६ नंतर एकही बॉलिवूडचा चित्रपट केला नाही. नुकताच एका टॉक शोमध्ये प्रियांका तिच्या नवीन चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसली. तिच्या या नव्या चित्रपटाचे नाव “इंजट इट रोमॅटिंक” असं आहे. या चित्रपटाचं प्रमोशन करत असताना प्रियांकाने तिच्या आगामी प्रोजेक्टचा देखील खुलासा केला आहे. प्रियांकाने सांगितल्याप्रमाणे ती ‘मॉं आनंद शीला’ यांच्या जीवनावर आधारीत चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटामध्ये ती माँ आनंद शीला यांची भूमिका साकारणार आहे.

माँ आनंद शीला यांचा प्रवास

माँ आनंद शीला यांचा जन्म गुजरातमधील बडोदरा येथे १९४९ साली झाला. सन्यास घेतल्यानंतर माँ शीला अमेरिकेत शिक्षणासाठी गेल्या. जेव्हा त्या भारतात परतल्या त्यानंतर त्या ओशोंच्या पुणे येथील आश्रमात राहू लागल्या. ९०च्या दशकातील धार्मिक गुरू ओशो (रजनीश ओशो) यांच संपूर्ण आयुष्य गुरू आणि अध्यात्मिक शिक्षक म्हणूनच गेले. माँ आनंद शीला यांचे वडील अंबालाल पटेल हे ओशोंचे शिष्य होते. ओशो नेहमी अंबालाल यांच्या घरी येत जात असत. त्यावेळी माँ आनंद शीला या १६ वर्षांच्या होत्या.

तुरुंगवास

ओशो यांच्या आश्रमात ५५ मिलियन डॉलरचा घोटाळा केल्याप्रकरणी शीला यांना ३९ वर्षांचा तुरूंगवास भोगावा लागला. जवळ-जवळ २० वर्षांनी शीला ‘डोंट किल हिम! ए मेम्वर बाई माँ आनंद शीला’ या पुस्तकात त्यांनी ओशो आश्रमाबद्दलचे रहस्य उघडकीस आणले. ओशो यांना भौतिक सुख-सुविधांचे आकर्षण असल्याचा उल्लेख त्यांनी या पुस्तकात केला आहे.

अमेरिकेतील सुप्रसिध्द दिग्दर्शक बेरी लेविन्सन हे हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहेत. हा चित्रपट माँ शीला यांच्या द्रुष्टिकोणातून सगळ्यांसमोर येणार आहे. त्यांच्या आयुष्यातील कष्ट केले, त्या अमेरिकेत कशा आल्या या सगळ्या गोष्टी आपण या चित्रपटात पहाणार आहोत.

नेटफ्लिक्सवरील डॉक्यूमेंटरी वाइल्ड वाइल्ड कंट्री जेव्हा रिलीज झाली तेव्हा ती खूप प्रसिध्द झाली होती. ही डॉक्यूमेंटरी ओशो यांच्यावर केलेली होती. आलिया भटने जेव्हा ही डॉक्यूमेंटरी पाहिली तेव्हा तिने देखील यांच्यावर होणाऱ्या चित्रपटात काम करण्याची इच्छा व्यक्त केली.

First Published on: January 31, 2019 3:27 PM
Exit mobile version