Video: धकधक गर्ल आणि देसी गर्लने घातला पिंगा!

Video: धकधक गर्ल आणि देसी गर्लने घातला पिंगा!

बॉलिवूडची धकधक गर्ल अर्थात माधुरी दीक्षित आपल्या डान्सने प्रत्येकवेळी प्रेक्षकांना घायाळ करते. सध्या माधूरी ‘डान्स दिवाने’ या रिअॅलिटी शोची जजींग करते. यावेळी या शोमध्ये देसी गर्ल प्रियांका चोप्राने हजेरी लावली. या दोन तारकांनी ‘डान्स दिवाने’ या रिअॅलिटी शोमध्ये आपल्या धमाकेदार नृत्याने प्रेक्षकांना भारावून सोडले. ‘डोला रे डोला’ व ‘पिंगा गं पोरी’ या एकमेकींच्या गाण्यावर दोघींनी मिळून नृत्य सादर केलं.

आगामी ‘द स्काय इज पिंक’ या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त प्रियांकाने ‘डान्स दिवाने’ या रिअॅलिटी शोमध्ये हजेरी लावली होती. या शोमध्ये माधुरी परीक्षक आहे. आपल्या नृत्यकौशल्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या या तारका एकाच मंचावर असल्यावर साहाजिकच या दोघींना डान्स करण्याचा अग्रह झाला.

यावेळी दोघींनीही अप्रतिम नृत्य सादर केलं.संजय लीला भन्साळी यांच्या ‘देवदास’ चित्रपटातील ‘डोला रे डोला’ आणि ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटातील ‘पिंगा गं पोरी’ या गाणी आजही लोकप्रिय आहेत. ‘डोला रे डोला’ या गाण्यावर माधुरी व ऐश्वर्या राय बच्चन तर ‘पिंगा’ गाण्यावर दीपिका पदुकोण व प्रियांका चोप्रा थिरकले होते.

येत्या ११ ऑक्टोबरला प्रियांका चोप्राचा द स्काय इज पिंक हा चित्रपट येत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी प्रियांका सध्या सगळीकडे प्रमोशनसाठी जात आहे. या चित्रपटात प्रियांकाबरोबर फरहान अख्तर,झायरा वासीम दिसणार आहेत. या चित्रपटात प्रियांकाने झायराच्या आईची भुमिका केली आहे.

First Published on: September 26, 2019 8:37 PM
Exit mobile version