प्रियांका चोप्राने केला धक्कादायक खुलासा

प्रियांका चोप्राने केला धक्कादायक खुलासा

बॉलिवूड आणि हॉलिवूड क्षेत्रात नावलौकीक कमावणारी अभिनेत्री प्रिय़ांका चोप्रा नुकतीच न्यूयॉर्क मधील 10th Annual Women in the World Summit या संमेलनात सहभागी झाली होती. यामध्ये तिने महिलांशी संबधित अनेक समस्यांवर चर्चा केली. यामध्ये लैंगिक अत्याचार या विषयावर देखील चर्चा झाली. २०१८ या वर्षी बॉलिवूडमध्ये #MeToo चळवळीची सुरूवात झाली होती. या अंतर्गत अनेक महिलांनी पुढे येऊन लैंगिक अत्याचाराचा आरोप अशा व्यक्तींवर केला की त्या व्यक्तींची कल्पना देखील केली जाऊ शकत नाही. याच गंभीर विषयावर प्रियांकाने या संमेलनात उघड चर्चा केली होती.

यावेळी, जगातील अनेक महिलांना प्रेरणा देणाऱ्या विषयावर बोलत असताना अजून एका गोष्टीचा प्रियांकाने खुलासा केला आहे, तो असा की अभिनेत्रींना देखील काहीवेळा अशा प्रसंगाना सामोरे जावे लागते आणि माझ्यावर ही अशी वेळ आली होती. प्रियांका म्हणाली, ”असे वाटते महिलांशी संबधित लैंगिक अत्याचार ही संकल्पना जोडली आहे. एकमेंकाना पाठिंबा देत असल्यामुळे लोक आम्हाला शांत करू शकत नाही. त्यामुळेच आम्हाला धैर्य मिळते”.

मागच्या वर्षी #MeTooचळवळीमध्ये नाना पाटेकर, साजीद खान, अलोक नाथ यासोबत अनेक सेलिब्रिटींची नाव आले होते. प्रियांकाने सांगितले की, तिने देखील हे सहन केले आहे. ”मला वाटते या अत्याचाराचा सगळ्याच महिलांना त्रास झाला असेल. पण याबद्दल आवाज उठवला तरी कोणी लक्ष दिले नव्हते,परंतु आता मला अजिबात याबाबतीत एकटे वाटत नाही आणि मला याची लाज वाटत नाही.”

ज्यावेळी, तनुश्री दत्ताने #MeToo या चळवळीची सुरूवात केली होती, तेव्हा प्रियांका अशी म्हणाली की, ”या चळवळीला फक्त लोकं बॉलिवूड या क्षेत्रापुरते मर्यादित ठेवत असाल तर हे चुकीचे आहे. या चळवळीला नीट समजून घेतले नाही. असे नाही की अशी घटना फक्त चित्रपट सृष्टीमध्येच घडतात. प्रत्येक नोकरीच्या ठिकाणी होतात. जे माझ्या सोबत घडले ते फार पुर्वी घडले. आपल्या देशातील महिलांना सामोरो जावे लागते. परंतु या विषयावर उघडपणे चर्चा होत नाही.”

First Published on: April 15, 2019 1:12 PM
Exit mobile version