या भारतीय अभिनेत्रीला पाकिस्तानातून विरोध

या भारतीय अभिनेत्रीला पाकिस्तानातून विरोध

प्रियांका चोप्रा

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये अजूनही तणावाच वातावरण आहे. संपूर्ण देशभरातून या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला गेला. यानंतर भारताने २६ फेब्रुवारीला केलेल्या एयर स्ट्राइक नंतर दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढला. भारत-पाकिस्तान दरम्यान चालणारी समझोता एक्सप्रेस देखील यावेळी बंद ठेवण्यात आली होती. त्याच पार्श्वभूमीवर सवयी प्रमाणे कुरापती करणाऱ्या पाकने भारतीय अभिनेत्री देसी गर्ल प्रियांका चोप्राला टार्गट केले आहे. तीला ‘युनिसेफ’च्या ‘गुडविल अ‍ॅम्बॅसिडर’ पदावरून हटवण्याची मागणी पाकने केली आहे. यामूळे पाकिस्तानातील नेटकऱ्यांनी एक ऑनलाईन मोहीम सूरु केली असून प्रियांकाला ‘युनिसेफ’च्या ‘गुडविल अ‍ॅम्बेसिडर’ पदावरून हटवा अशी मागणी केली जात आहे.

नेटकऱ्यांनी केले टार्गट

देसी गर्ल प्रियांका चोप्राला पाकिस्तानी नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे. २०१६ साली प्रियांकाची ‘युनिसेफ’च्या ‘गुडविल अ‍ॅम्बेसिडर’पदावर नियुक्‍ती करण्यात आली. दहावर्षासाठी तीची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. भारताने केलेल्या एयर स्ट्राइकवर प्रियांका चोप्राने भारतीय सेनेच कौतुक करताना जय हिंद अस ट्विट केल होत. त्यामुळे तिला पाकिस्तानी नेटकऱ्यांनी टार्गट केले आहे.

Jai Hind #IndianArmedForces ?? ??

— PRIYANKA (@priyankachopra) February 26, 2019

काय म्हणाली प्रियांका

दरम्यान, अभिनेत्री प्रियांका चोप्राने मला केवळ नैराश्याच्या भावनेतून ट्रोल केले जात असल्याच यावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे. दोन्ही देशांमधील सद्य परिस्थितीचा सर्वच घटकांवर परिणाम होताना दिसत आहे. आगामी विश्वचषकात भारत पाकिस्तान सामन्याला देखील विरोध होत आहे. दहशतवादाला पाक खतपाणी घालत असल्याने भारताने पाकची कोंडी केली त्यामुळे जागतिक स्तरावरील दबावामुळे अभिनंदन यांना सोडणे पाकला भाग पडले. त्यामुळे काहीना काही कारण काढून पाकिस्तान अश्या कुरापती करत आहे.

First Published on: March 5, 2019 10:42 AM
Exit mobile version