Priyanka Chopra : प्रियांका चोप्राने पती अन् लेकीसह घेतलं रामलल्लाचं दर्शन

Priyanka Chopra : प्रियांका चोप्राने पती अन् लेकीसह घेतलं रामलल्लाचं दर्शन

ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा गेल्या महिन्यात एका कार्यक्रमानिमित्त लेक मालतीसह भारतात आली. तिच्या पाठोपाठ तिचा पती निक जोनस देखील मुंबईत आला होता. मुंबई विमानतळावर प्रियांकाच्या नवऱ्याचं जोरदार स्वागत करण्यात आलं होतं. आता हे संपूर्ण कुटुंबीय अयोध्येला पोहोचलं आहे.

प्रियांकाने नुकतंच अयोध्येतील राम मंदिरात जाऊन रामललाचं दर्शन घेतलं आहे. प्रियांकासह तिचा पती निक जोनसही रामलल्लाच्या चरणी नतमस्तक झाला. लेक मालतीला घेऊन प्रियांका रामलल्लाच्या दर्शनाला गेली होती. प्रियांकाने अयोध्येत दर्शन घेतल्याचा आणि विमानतळावरुन बाहेर पडतानाचा व्हिडीओ एएनआयवरून शेअर करण्यात आला आहे. यावेळी अभिनेत्रीबरोबर तिची आई डॉ. मधू चोप्रा देखील उपस्थित होत्या.

 जानेवारी महिन्यात अयोध्येत श्री राम मंदिरात रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला होता. यावेळी प्रियांका चोप्रा गैरहजर होती. या सोहळ्याला अमिताभ बच्चन, रणबीर कपूर, आलिया भट्ट, विकी कौशल, कतरिना कैफ, रजनीकांत, अभिषेक बच्चन यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.
गुरुवारी रात्री मुलीसोबत भारतात आल्यानंतर तिने मुंबईतल्या एका कार्यक्रमात हजेरी लावली. प्रियांका ही Bvlgari या जगप्रसिद्ध ब्रँडची अॅम्बेसेडर असल्याने मुंबईतल्या स्टोअर लाँचसाठी ती उपस्थित होती. त्यानंतर ईशा अंबानीकडून आयोजित प्री-होळी पार्टीलाही तिने हजेरी लावली होती.

लग्नानंतर प्रियांका परदेशात स्थायिक झाली असली तरी कामानिमित्त ती अनेकदा भारतात येते. किंबहुना परदेशात असतानाही ती कधीच भारतीय संस्कार विसरली नाही, याची प्रचिती तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून येते. पती निक आणि मुलगी मालतीसोबत ती अनेकदा पूजा, देवाची अर्चना करताना दिसून येते.

First Published on: March 20, 2024 5:14 PM
Exit mobile version