घरातील ‘या’ व्यक्तीमुळे जान्हवी कपूर, वडील आणि बहिणीसह क्वारंटाईन!

घरातील ‘या’ व्यक्तीमुळे जान्हवी कपूर, वडील आणि बहिणीसह क्वारंटाईन!

janhvi kapoor, boni kapoor

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची पती आणि बॉलिवूड निर्माते बोनी कपूर यांच्या यांच्या घरी कोरोनाचा शिरकाव झाला आहे. बोनी कपूर यांच्या घरी काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली. या संदर्भात बोनी कपूर यांची मुलगी अभिनेत्री जान्हवी कपूर हिनं तिच्या अकाऊंटवर एक पत्रक शेअर केलं आहे. कोणत्या प्रकारच्या अफवा पसरू नेय यासाठी हे पत्रक शेअर करत असल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे.

बोनी कपूर यांच्या निवासस्थानी म्हणजेच लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला कोरोना टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. काही दिवसांपासून या कर्मचाऱ्याची तब्येत बरी नव्हती. शनिवारी त्याला उपचारांसाठी दवाखान्यात पाठवण्यात आलं होतं. तेव्हापासून त्याला आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर त्याची करोना चाचणी करण्यात आली.

पालिकेच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ घरी येत त्या कर्मचाऱ्याला उपचारांसाठी घेऊन जाण्यात आलं. घरातील इतर कर्मचारी आणि कुटुंबिय यांच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणं आढळली नाहीत असंही बोनी यांनी स्पष्ट केलं आहे. लॉकडाऊन घोषित झाल्यापासून त्याच्या घरातील कोणताही व्यक्ती बाहेर पडला नाहीए. कोरोनाची लागण झालेला कर्मचारी देखील उपचार घेऊन लवकरच बरा होईल आणि घरी परत येईल, अशी आशा आहे; असं बोनी या पत्रात म्हटले आहे.

लॉकडाऊन ४ चे नवे नियम लागू होताच मुंबई महापालिकेनेही बिल्डिंग सील करण्याचे नियम बदलले आहेत. एखादा रुग्ण सापडला म्हणून संपूर्ण सोसायटी किंवा बिल्डिंग सील करण्याची गरज नाही, असं बीएमसीने सांगितलं आहे. बॉलिवूड चित्रपट निर्माते बोनी कपूर यांच्या घरात काम करणाऱ्या एका व्यक्तीला करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे बोनी कपूरसह दोन्ही मुली जान्हवी कपूर आणि खूशी कपूरने स्वत:ला क्वारंटाइन केले आहे.

First Published on: May 20, 2020 9:19 AM
Exit mobile version