तर माझ्यावर बलात्कार झाला असता, राधिका आपटेचा धक्कादायक खुलासा!

तर माझ्यावर बलात्कार झाला असता, राधिका आपटेचा धक्कादायक खुलासा!

राधिका आपटे

बदलापूर, अंधाधून, फोबिया, कबाली, शोर इन द सिटी या सारख्या चित्रपटांमधून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री राधिका आपटे नुकताच एक धक्कादायक खुलासा केला आहे. आपल्या तरूणपणीच्या आठवणी सांगताना राधिकाने हा खुलासा केला आहे. राधिकाला पुण्यावरून मुंबईला जाण्यास अनेकांनी विरोध केला. तीला सांगण्यात आले की, तीच्यावर या फिल्म इंडस्ट्रीमध्ये बलात्कार केला जाऊ शकतो.

प्रसिद्ध अभिनेत्री राधिका आपटेने चित्रपटसृष्टीबद्दल खुलासा केला. राधिका या फिल्म इंडस्ट्रीबद्दल बोलताना म्हणाली की, मला सुरूवातीला पुण्यावरून मुंबईला येताना अनेकांनी विरोध केला. मुंबईत आल्यावर या फिल्म इंडस्ट्रीमध्ये माझ्यावर बलात्कार होऊ शकतो. त्यामुळे मी या इंडस्ट्रीमध्ये येऊ नये असं अनेकांना वाटत होतं. प्रत्येकाला फिल्म इंडस्ट्रीमध्ये काहीतरी ना काही त्रास सहन करावा लागतो. त्यातूनही भयानक म्हणजे कोणीच कधीच या विषयी काही बोलत नाही. अगदी शेवटच्या टप्प्यावर याविषयी बोललं जातं. आम्ही कलाकारही माणसंच आहोत. तुमच्या लोकांसारखीच मी एक आहे. आम्हालाही सर्वसामान्यांप्रमाणे जीवन जगायचं असतं.

नेटफ्लिक्सवर राधिकाच्या सतत येणाऱ्या वेबसिरीज, फिल्मबद्दल राधिका म्हणाली, “मला हे मान्य करायचे आहे की, मी नेटफ्लिक्सबरोबर एक चांगले संबंध आहेत. या  ओटीटी प्लॅटफॉर्मबद्दल देवाचे खूप आभार, ओटीटी प्लॅटफॉर्मचं या चित्रपटसृष्टीत खूप मोठं योगदान ठरणार आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म लहान चित्रपटांसाठी अधिक फायदेशीर आहे.

First Published on: August 4, 2020 9:22 PM
Exit mobile version