लंडनच्या रेस्टॉरंटमध्ये जेवल्यावर राधिका आपटे तृप्त; पण यामुळे नेटकऱ्यांनी केलं ट्रोल!

लंडनच्या रेस्टॉरंटमध्ये जेवल्यावर राधिका आपटे तृप्त; पण यामुळे नेटकऱ्यांनी केलं ट्रोल!

कोलकात्यात 'मिसेस अंडरकव्हर' चे कोरोना काळातले शूटिंग, राधिका आपटेने शेअर केला अनुभव !

बॉलिवूडमध्ये जिथे कोरोना व्हायरसच्या साथीमुळे बरेच कलाकार मंडळी घराबाहेर पडत नाहीत. तर बरेच जण आपल्या जवळच्या लोकांना भेटण्यासाठी इतर शहरांमध्ये पोहोचले आहेत, तर काही जण देशाबाहेर गेले आहेत. काही दिवसांपूर्वी अनलॉक प्रक्रियेदरम्यान राधिका मदन आणि रकुल प्रीत सारखे सेलिब्रिटी आपल्या गावी पोहोचले होते, तर सनी लिओनी अमेरिकेत आपल्या कुटुंबासह वेळ घालवत आहे. दरम्यान, राधिका आपटे देखील सध्या आपल्या पतीसह लंडनमध्ये आहे. नुकताच तिने एक फोटो शेअर केले ज्यावर चाहत्यांनी तिला चांगलेच ट्रोल केले.

राधिकाने लंडनमधील लोकप्रिय भारतीय रेस्टॉरंटविषयी एक पोस्ट शेअर केली आहे. या फोटोत राधिकासह शेफ सुरेंदर मोहनही दिसतोय. राधिकाला या रेस्टॉरंटचे जेवण इतके आवडले की तिने एक खास पोस्ट शेअर केली आहे.

राधिकाने या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, मला होस्ट केल्याबद्दल आणि घरी उत्तम जेवण खाऊ घातल्याबद्दल धन्यवाद देखील दिले आहे. सुरेंद्र मोहन तुमचे कर्मचारी उत्कृष्ट आहेत. मी माझ्या मित्रांसह येथे परत येऊ इच्छिते. तुमचे खूप खूप धन्यवाद. सोनम कपूरनेही राधिकाच्या या पोस्टवर कमेंट करत या रेस्टॉरंटला सर्वोत्कृष्ट संबोधले आहे.

…म्हणून राधिका झाली ट्रोल

राधिकाच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट केली त्यात असेही लोक होते, ज्यात तिने मास्क न घातल्यामुळे राधिकाची ही पोस्ट त्यांना आवडली नाही. एका युजर्सने असेही लिहिले आहे की, तिने सोशल डिस्टेन्सिंगचे पालन केले पाहिजे होते. दरम्यान कोरोना विषाणूच्या साथीमुळे मास्क आणि सोशल डिस्टेन्सिंग यासारखे शब्द बर्‍यापैकी सामान्य झाले आहेत आणि या विषाणूचा धोकादायक परिणाम भारत ते लंडनपर्यंत दिसून आला आहे.


भात शेतीत सलमान चिखलाने माखला; म्हणतो शेतकऱ्यांचा करा सन्मान!
First Published on: July 14, 2020 8:59 PM
Exit mobile version