राहुल खन्नाच्या बोल्ड सेल्फीवर मलाईका ‘फिदा’

राहुल खन्नाच्या बोल्ड सेल्फीवर मलाईका ‘फिदा’

बॉलीवूडचा हँडसम अभिनेता राहुल खन्ना सध्या मोठ्या पडद्यापासून जरी लांब असला तरी सोशल मीडियावर तो सक्रिय असतो. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी तो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्याची अपटेड देत असतो. राहुलने नुकताच त्याचा एक बाथरोब मधला बोल्ड अवतारतला फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला ज्यामुळे सर्वत्र एकट खळबळ उडाली आहे. त्याच्या त्या आरश्ातल्या बोल्ड सेल्फीवर चाहत्यांसह अख्ख बॉलीवूड भाळले आहे. अभिनेत्री मलाईका तर राहुलच्या त्या बोल्ड लूकवर फुल टू फिदा झाली आहे.

या फोटोने मलायकालाच नाही तर करन जौहर आणि सिंकदर खेरचेही लक्ष वेधले असून त्यांनी त्यावर मजेशीर कमेंटस केल्या आहेत. राहुलने आरशासमोर हा सेल्फी काढला असून आरश्याच्या आड तो स्वता:ला लपवत असल्याचं फोटोत दिसतयं. या फोटोवर मलाईकाने केलेले कमेंट्ही तेवढेच हॉट आहे. राहुल या फोटोतून आरसाच फोडेल असे तिने म्हटले आहे. तर व्ही जे अनुषा हीने राहुलचा फोटो बघून अनेकांनी मजेशीर कमेंटसही केल्या आहेत. करण जौहरने तर ‘ओह’ एवढेच लिहून आपल्या मनातल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

मॉडेल म्हणून रँम्पवर गाजलेल्या राहुलने दीपा मेहता यांच्या ‘1947 अर्थ’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर दिल कबड्डी, वेक अप सिद, लव आज कल, आणि फायर फ्लाईज यातही राहुल झळकला होता.

First Published on: February 7, 2020 2:43 PM
Exit mobile version