‘आर आर आर’ सिनेमाची प्रदर्शनापुर्वीच कोटींची कमाई!

‘आर आर आर’ सिनेमाची प्रदर्शनापुर्वीच कोटींची कमाई!

राजा मौलीच्या 'आर आर आर' सिनेमाने रचला इतिहास, प्रदर्शित होण्याअगोदरच एवढे कमवले!

सुपरहिट सिनेमा ‘बाहुबली’चे दिग्दर्शक एस एस राजा मौली यांच्या ‘आर आर आर’ सिनेमाने प्रदर्शित होण्याअगोदरच ७० कोटीं कमवले आहेत. हा सिनेमा ‘तेलगु’ आणि ‘तमिळ’ भाषांत बनवली जात आहे. परंतु हा सिनेमा ‘हिंदी’ आणि ‘मलयालम’ या दोन भाषेत डब केली जाणार आहे. या सिनेमात एन टी रामा राव, राम चरण आणि राहुल रामकृष्ण यांच्यासह बॉलिवूडचे कलाकार आलिया भट्ट आणि अजय देवगन हे देखील दिसणार आहेत. ‘बाहुबली’च्या मोठ्या यशानंतर ‘आर आर आर’ सिनेमासाठी अनेकजणं उस्तुक आहेत.

प्रसिद्ध सिनेमा दिग्दर्शक एस एस राजा मौलीच्या नव्या सिनेमाने पुन्हा एकदा नवा इतिहास रचला आहे. माहितीनुसार, ‘आर आर आर’ सिनेमाचे निर्माता यांनी विदेशी थिएट्रिकल राइट्सच्या आधारावर ७० कोटींची कमाई केली आहे. या सिनेमाचे बजट ३०० कोटीं इतकी आहे. परंतु या सिनेमाने प्रदर्शित होण्याअगोदरच ७० कोटींची कमवले आहते तर, रिलीज झाल्यावर बॉक्स ऑफिसवर आणखी विक्रम रचेल, अशी अपेक्षा केली जात आहे. ‘आर आर आर’ सिनेमाची टीमने त्यांचा पहिला शेड्युल पार पाडला आहे. हा सिनेमा १९२० मधील स्वतंत्र सैनिक, अल्लूरी सिताराम राजू आणि कोमाराम भीम यांच्यातील एक काल्पनिक गोष्ट आहे. या सिनेमात ब्रिटिंशांच्या विरोधात पुकारलेले आंदोलन दाखवले जाणार आहे. हा सिनेमा ३० जुलै २०२० मध्ये प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षकांना हा सिनेमा नक्की आवडेल, अशी खात्री सिनेमाचे दिग्दर्शक राजा मौली यांनी दर्शवली आहे.

First Published on: June 19, 2019 1:08 PM
Exit mobile version