Shivani-Ambar Engagement : शिवानी सोनारने या अभिनेत्यासोबत उरकला साखरपुडा

Shivani-Ambar Engagement : शिवानी सोनारने या अभिनेत्यासोबत उरकला साखरपुडा

‘रंग माझा वेगळा’मधील आदित्य म्हणजेच अभिनेता अंबर गणपुलेने अभिनेत्री शिवानी सोनारसह गुपचूप साखरपुडा उरकला. या साखरपुड्याचे फोटो, व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

‘राजा राणी ची गं जोडी’ या मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री म्हणजे शिवानी सोनार.

शिवानीनं अभिनेता अंबर गणपुळेबरोबर साखरपुडा केला आहे. अंबर झी मराठीवरील लोकमान्य या मालिकेत दिसला होता.

अंबर याआधी रंग माझा वेगळा या मालिकेत काम करत होता. या मालिकेत त्यानं दीपाच्या दिराची आदित्यची भुमिका साकारली होती.

यांच्या साखरपुड्याचे फोटो, व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या साखरपुड्याच्या पोस्टवर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षावर केला आहे.

साखरपुड्याचे फोटो शेअर करत शिवानीने लिहिलं आहे, “अलेक्सा प्लीज प्ले, एक दिन आप यूं हमको मिल जायेंगे. #Ambani.”

शिवानीनं साखरपुड्यासाठी खास सोनेरी रंगाचा घागरा घातला होता. त्यावर तिनं हेवी व्हाइट आणि डायमंड ज्वेलरी परिधान केली होती.

अंबरने निळ्या रंगाचा इंडो वेस्टर्न आउटफिट परिधान केला होता. शिवानी व अंबर खूपच सुंदर दिसत होते.

रिंग सेरेमनी होण्याआधीच्या विधींसाठी शिवानीनं खास लुक केला होता. या लुकमध्येही शिवानी अत्यंत गोड दिसत होती. शिवानीनं पिवळी आणि नारंगी रंगाची साडी परिधान केली होती. या फोटोमध्ये शिवानीच्या कपाळावर नाण्याचा टिळा देखील दिसत आहे. तिनं गळ्यात फुलांचा हार देखील घातला आहे.

_____________________________________________________________

हेही वाचा : ‘जुनं फर्निचर’ मधील ‘काय चुकले सांग ना ?’ गाणे प्रदर्शित

First Published on: April 10, 2024 6:01 PM
Exit mobile version