काला चित्रपटातील Thar Suv ‘महिंद्रा’च्या म्युझियममध्ये

काला चित्रपटातील Thar Suv ‘महिंद्रा’च्या म्युझियममध्ये

'काला' चित्रपटात दिसलेली Thar suv

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांतच्या ‘काला’ चित्रपटात दिसलेली Thar suv ही आता महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महेंद्रा यांच्या कलेक्शनमध्ये ‘महिंद्राच्या ऑटो म्युझियम’ मध्ये दिसणार आहे. गेल्या वर्षी काला चित्रपटाच्या शुटींगदरम्यान कालाच्या निर्मात्यांना ट्विटरच्या माध्यमातून आनंद महेंद्रा यांनी एक विनंती केली होती.

Thar SUV ला या चित्रपटात वापरण्याची विनंती त्यांनी केली होती आणि त्यानंतर ती गाडी कंपनीच्या संग्रहालयात ठेवली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. त्यावेळी ‘काला’ची शुटिंग सुरू होती आणि तेव्हा धनुषने ट्विटरच्या माध्यमातून आनंद महिंद्रा यांना होकारही कळवला होता.

धनुषने कार केली परत
हा चित्रपट आता देशभर प्रदर्शित झाला आणि चित्रपटात वापरण्यात आलेली थार गाडी धनुषने महिंद्रा कंपनीला परत केली. ही गाडी सध्या ‘महिंद्रा’च्या चेन्नईतल्या रिसर्च व्हॅलीमध्ये ठेवण्यात आली आहे. चित्रपट प्रदर्शनाच्या दिवशी टीममधील कर्मचाऱ्यांचा या गाडीसोबत फोटो आणि व्हिडिओ आनंद महिंद्रा यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

महिंद्रा अँड महिंद्राच्या ऑटो म्युझियममध्ये स्थान
आनंद महिंद्रा यांनी अशा प्रकारे महिंद्रा अँड महिंद्राच्या ऑटो म्युझियममध्ये स्थान देण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधी त्यांनी केरळमधल्या एका रिक्षा चालकाच्या रिक्षाला या संग्रहालयात स्थान दिलं होतं. कारण त्याने महिंद्रा स्कॉर्पिओसारखा लूक देत त्या रिक्षाला मॉडिफाय केलं होतं. महिंद्रा कंपनीने ती रिक्षा त्या व्यक्तीकडून विकत घेतली आणि त्या बदल्यात नवीकोरी महिंद्रा सुप्रो मिनी ट्रक त्याला दिली होती.

First Published on: June 11, 2018 7:07 AM
Exit mobile version