राकेश आणि शमिता यांनी दिला नात्याला पूर्णविराम; सोशल मीडियावर केली घोषणा

राकेश आणि शमिता यांनी दिला नात्याला पूर्णविराम; सोशल मीडियावर केली घोषणा

बिग बॉस ओटीटी फेम शमिता शेट्टी आणि अभिनेता राकेश बापट यांच्या जोडीचे अनेक चाहते आहेत. मात्र मागील अनेक दिवसांपासून यांच्या नात्याबाबत वेगवेगळ्या बातम्या वारंवार समोर येत होत्या. दरम्यान, राकेश आणि शमितानेही या सर्व चर्चेला कायमचा पूर्णविराम लावलेला आहे. नुकतीच या दोघांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक स्टोरी शेअर करत आपल्या ब्रेकअपची घोषणा केली. ही बातमी कळताच त्यांचे सर्व चाहते नाराज झाले आहेत.

शमिता आणि राकेश होणार वेगळे
शमिता शेट्टी आणि राकेश बापटची रोमाँटिक लवस्टोरी करण जौहरच्या बिग बॉस ओटीटी या रियालिटी शोमध्ये सुरू झाली. यावेळी ते पहिल्यांदा एकमेकांचे मित्र झाले आणि हळूहळू यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. हा शो संपल्यानंतर देखील दोघं बऱ्याचदा एकमेकांसोबत असायचे. सोशल मीडियावर देखील दोघांचे फोटो शेअर करायचे. मात्र आता त्यांनी एकमेकांपासून वेगळं व्हायचा निर्णय घेतला आहे. याबाबत खुलासा करत त्यांनी आपल्या इंस्टाग्रामद्वारे चाहत्यांना याबाबत माहिती दिली.

राकेशने केला खुलासा


इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करत राकेशने शमितासोबत ब्रेकअप केला असल्याची माहिती चाहत्यांना दिली. त्यात त्याने लिहिलंय की, “मी सर्वांना सांगू इच्छितो की, मी आणि शमिता आता एकत्र नाही. नियतीने आम्हाला खूप वेगळ्या परिस्थितमध्ये एकत्र आणलं. शारा चाहत्यांनी सपोर्ट आणि प्रेमाबद्दल खूप धन्यवाद. मला ठाऊक आहे की हे कळताच तुम्ही नाराज व्हालं. पण मी आशा करतो की, तुम्ही आमच्या दोघांवर वेगवेगळं प्रेम करत राहाल. नेहमी तुमच्या पाठिंब्याची गरज राहिल.”

 शमिताने सुद्धा केली घोषणा


हेही वाचा :तापसी पन्नू भारतीय सिनेमा क्षेत्रातील सर्वात वैविध्यपूर्ण अभिनेत्री

First Published on: July 27, 2022 12:05 PM
Exit mobile version