भररस्त्यात राखीला कोसळले रडू, म्हणाली सलमान आणि सोहेलने वाचवला माझ्या आईचा जीव

भररस्त्यात राखीला कोसळले रडू, म्हणाली सलमान आणि सोहेलने वाचवला माझ्या आईचा जीव

बॉलिवूडची ड्रामा क्विन राखी सावंत नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत येत असते. राखी सावंतची आई जया सावंत गेल्या अनेक महिन्यांपासून कॅन्सरशी लढा देत आहे. आपल्या आईच्या आजारपणाविषयी स्वत: राखी सावंतने सोशल मीडियाद्वारे माहिती दिली होती. राखी बिग बॉस १४ मध्ये असतानात तिला तिच्या आईच्या आजारपणाविषयी समजले होते. मात्र आईच्या उपचारासाठी तिच्याकडे पैसे नव्हते. शो मधून मिळालेल्या पैशातून ती आईवर उपचार करु इच्छित होती. पण सलमान खान तिच्या मदतीसाठी धावून गेला होता. सलमानने राखीच्या आईचा आजारपणाचा सर्व खर्च केला. त्यानंतर राखीच्या आईची यशस्वीरित्या शस्त्रक्रिया पार पडली. तिच्या पोटातील कॅंसर ट्युब बाहेर काढण्यात आला. आपल्या आईची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडून ती कॅंसरमुक्त झाल्यानंतर राखी भावुक झाली. त्यात ती चक्क रस्त्यावर ठसा ठसा रडू लागली. खर तर राखीचे हे आनंदाश्रू आहेत. अगदी भर रस्त्यात डोकं टेकत, हात जोडत तिने सलमानचे नाव घेत त्याचे आभार मानले आहे. राखीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. विरल भयानी यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.

राखी माध्यमाशी बोलताना म्हणाली की, माझ्याकडे पैसे नव्हते आईच्या उपचारासाठी डॉक्टरांनी जास्त पैसे सांगितले होते. कमीत कमी १५-२० दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवावे लागणर, अशावेळी सलमान आणि सोहेल खान देवदूतासारखे माझ्या मदतीला धावून आले. त्यामुळेच माझी आई वाचली. असे म्हणत राखी अक्षरहश: जमिनीवर डोकं टेकवून सलमान खान आणि सोहेल खानचे आभार मानले आहे.

राखी बिग बॉस 14 मध्ये असताना तिला आईची किमोथेरपी व कॅन्सरबद्दल माहित झाले होते. आईच्या उपचारासाठी राखीला पैशांची गरज होती. या पैशासाठीच तिने 10 लाख रूपये घेऊन बिग बॉसचा शो सोडला होता. याशिवाय सलमान व सोहल खानने राखीची मदत केली होती. सलमानने राखीच्या आईच्या उपचाराचा सर्व खर्च उचलला होता.


हे वाचा-  कॉमेडियन सुनील पालचे वादग्रस्त वक्तव्य, AIIMS च्या डॉक्टरांनी केली अटकेची मागणी

First Published on: April 20, 2021 1:27 PM
Exit mobile version