राखीने शेअर केले हॉट हनिमून फोटो

राखीने शेअर केले हॉट हनिमून फोटो

राखीने जाहीर केले 'खतरो के खिलाडी ११' च्या विजेत्याचे नाव, पहा काय म्हणाली राखी

सध्या बॉलिवूडची अभिनेत्री राखी सावंत ही सोशल मीडियावर फारच अॅक्टिव असते. सोशल मीडियावर ती नवनवीन फोटो शेअर करतं. ते सर्व फोटो हे खूप व्हायरल होतात. नुकतचं राखी विवाहबंधनात अडकल्याची माहिती सोशल मीडियावर चर्चेत आली होती. तिने अमेरिकेतील एनआरआय व्यक्तीसोबत लग्न केले आहे. आता तिने सोशल मीडियावर  हनिमूनचे फोटो शेअर केले आहेत. तिचे हे हनिमूनचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

इन्स्टाग्राम अकाऊंटवर राखीने हनिमूनचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिचा हॉट अंदाज दिसत आहे. फोटोमध्ये तिने लाल रंगाचा वन पिस घातला असून सन ग्लासेस देखील घातले आहेत. राखीचा हा हॉट लूक चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे.

तसेच तिने एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती पाण्यासोबत मस्ती करताना दिसत आहे.

दोन दिवसांपूर्वी तिने बाथरूम मधील फोटो शेअर केले होते. हे फोटो देखील तिचे तुफान व्हायरल झाले होते.

सध्या राखी ही कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन झाली आहे. जरी तिने लग्नबाबतचे गुपित सांगितले असले तरी मात्र अद्यापही नवऱ्या सोबतचा एकही फोटो शेअर केलेला नाही आहे. राखीने अचानक गतवर्षी नोव्हेंबरमध्ये स्वतःच्या लग्नाची पत्रिका पोस्ट केली होती. यामुळे तिच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. तसेच ती दीपक कलालसोबत विवाह करणार असल्याची चर्चा सुरू होती. एवढंच नव्हे तर दीपक कलालने देखील इन्स्टाग्राम अकाऊंटवर राखी सावंतला प्रपोज केल्याचा व्हिडिओ शेअर केला होता. पण हे काही खरे झाले नाही.

First Published on: August 15, 2019 4:24 PM
Exit mobile version