‘हाथी मेरे साथीचा’ दमदार ट्रेलर प्रदर्शित

‘हाथी मेरे साथीचा’ दमदार ट्रेलर प्रदर्शित

'हाथी मेरे साथी' चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर

इरॉस इंटरनॅशनलने ‘ हाथी मेरे साथी’ या चित्रपटाच्या बहुप्रतिक्षित हिंदी ट्रेलरचे व्हर्च्युअल कॉन्फरन्सद्वारे अनावरण केले. चेन्नई आणि हैदराबाद येथे ३ मार्च रोजी जागतिक वन्यजीव दिननिमित्त चित्रपटाच्या निर्मात्यांनी त्रिभाषिय चित्रपटाचा बहुप्रतिक्षित तमिळ आणि तेलुगु भाषेतील ट्रेलर प्रदर्शित केला. यावेळी या चित्रपटाचे कलाकार राणा दग्गुबाती, प्रभू सोलोमन, विष्णू विशाल, श्रिया पिळगावकर आणि झोया हुसेन हे ही उपस्थित होते. या चित्रपटातच्या तिन्ही आवृत्त्यांमध्ये राणा पूर्णपणे वेगळ्या अवतारात मुख्या भूमिका साकारत आहे. हाथी मेरे साथीच्या हिंदी व्हर्जनमध्ये तो पुलकित सम्राटसोबत मुख्य भूमिका साकारत असून विष्णू विशालसोबत कादान (तमिळ) आणि अरण्या (तेलगू) मध्ये दिसणार आहे. तसेच श्रिया पिळगावकर आणि जोया हुसेन या अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. येत्या मकरसंक्रांतीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हाथी मेरे साथी ही या चित्रपटाची कहाणी ही बरचसे आयुष्य जंगलात घालवून पर्यावरणाचे रक्षण करणाऱ्या एका माणसाची आहे. माणूस आणि हत्ती यांच्या नात्यातील ही अंतहीन कथा आहे. राणा दग्गुबातीच्या ‘बाहुबली’ आणि ‘द माझी अॅटॅक’ नंतर हाथी मेरे साथी हा तिसरा त्रिभाषीय चित्रपट असल्याने ही त्याच्यासाठी हॅटट्रिक असणार आहे. हा पॅन-इंडिया बहुभाषिक चित्रपट २६ मार्च २०२१ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

First Published on: March 4, 2021 6:12 PM
Exit mobile version