रणबीर आणि आलियाचा मुखवटा घातलेला व्हिडिओ व्हायरल

रणबीर आणि आलियाचा मुखवटा घातलेला व्हिडिओ व्हायरल

रूषी कपूर यांना रूग्णलयात भेट देताना रणबीर, आलियाने लावले होते मुखवटे

अभिनेते रणबीर आणि आलिया भट्ट नेहमीच ह्या ना त्या कारणांवरून चर्चेत असतात. अनेक वेळा आलिया आणि रणबीर एकत्र दिसतात. तसेच आलिया रणबीरच्या कुंटुबीयांसोबतही वेळ घालवते. अशातच ऋषी कपूर यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्लीतील एका रूग्णालयात दाखल केले आहे. यासाठी रणबीर आणि आलिया हे नितू यांच्यासोबत दिल्लीकडे रवाना झाले होते. याच दरम्यानचा त्यांचा विमानतळावरचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये रणबीर आणि आलियाने चेहऱ्यावर एक मुखवटा लावला आहे. यावर व्हायरसच्या भीतीपोटी त्यांनी हा मुखवटा लावला असल्याचा नेटकऱ्यांच्या चर्चा रंगत आहेत. मात्र, त्यानंतर करोना व्हायरसचे बळी पाहता योग्य ती काळजी घेण्यासाठी आम्ही मुखवटा लावल्याचे एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत रणबीर कपूरने सांगितले. यामुळे, इतर लोकही काळजी घेतील अशी रणबीर कपूरने आशा व्यक्त केली आहे. तसेच ऋषी कपूर यांची प्रकृती आता व्यवस्थित असल्याचेही त्याने सांगितले.

केरळमध्ये करोना व्हायरसचा तिसरा रूग्ण 

गेल्याच आठवड्यात करोना व्हायरसचा सुरू असलेला उद्रेक पाहायला मिळाला. सोमवारी चीनमधील मृतांचा आकडा ३६१ वर पोहोचला असून, देशभरात १७,००० हून अधिक लोक संक्रमित झाले आहेत. भारत, अमेरिका, जर्मनी आणि ऑस्ट्रेलियासह किमान २४ देशांमध्ये या विषाणूचा प्रादुर्भाव पसरला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक आरोग्य आणीबाणीही जाहीर केली आहे. तसेच, केरळमधले करोना व्हायरसचे तिसरे प्रकरण भारताने नोंदवले आहे. केरळमध्ये करोना व्हायरसचा तिसरा रूग्ण सापडला आहे.

रणबीर, आलियाचा बहुप्रतिक्षित सिनेमा ४ डिसेंबरला होणार प्रदर्शित

‘रणबीर कपूर’ आणि ‘आलिया भट्ट’ यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘ब्रम्हास्त्रला’ अखेर नवी रिलीज डेट मिळाली आहे. ४ डिसेंबरला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन, मोनी रॉय आणि नागार्जुन अक्किनेनी हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

First Published on: February 3, 2020 8:13 PM
Exit mobile version