रणवीरच्या हातावर चढला दीपिकाच्या नावाचा मेहंदीचा रंग

रणवीरच्या हातावर चढला दीपिकाच्या नावाचा मेहंदीचा रंग

रणवीरच्या हातावर चढला दीपिकाच्या नावाचा मेहंदीचा रंग

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग तुफानी अभिनयाद्वारे चित्रपटांद्वारे मोठ्या पडद्यावर चमकत आहे. मात्र रणवीर आता टीव्हीच्या दुनियेतही आपली छाप पाडताना दिसतोय. रणवीर सिंह त्याच्या छोट्या पडद्यावरील पहिला शो ‘द बिग पिक्चर’साठी चर्चेत आहे. हा शो कलर्सवर प्रसारित होत आहे. या शोच्या आगामी भागांमध्ये करवा चौथ विशेष भाग दाखवला जाईल.यादरम्यान, अभिनेत्री प्रियांका चौधरी आणि निमृत कौर अहलुवालिया शोमध्ये दिसणार आहेत. यावेळी रणवीर सिंहला पाहून दोघांनी त्याच्या सोबत खूपच धम्माल केली. त्यांनी चक्क रणवीरच्या हातावर मेहंदी लावली आहे.

रणवीर सिंगचा हा व्हिडिओ कलर्सने ट्विटरवर पोस्ट केला आहे. रणवीरने दीपिकासाठी उपवासही करणार असल्याचं रणवीरने सांगितलं आहे. ‘द बिग पिक्चर’च्या करवाचौथ स्पेशल एपिसोडमध्ये निमृत कौर आणि प्रियांका चौधरी रणवीर सिंगच्या हातावर दीपिकाच्या नावाने मेंदी लावताना दिसत आहेत. रणवीरही आनंदाने मेहंदी लावून घेत आहे. सध्या रणवीरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

 

व्हिडिओ पाहा-

रणवीर सिंगच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो लवकरच दीपिका पदुकोणसोबत ’83’ चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय तो ‘जयेश भाई जोरदार’ आणि ‘सूर्यवंशी’ चित्रपटातही दिसणार आहे. रणवीर ‘सूर्यवंशी’ मध्ये कॅमिओ करणार आहे तर ‘रॉकी और राणीकी प्रेमकथा’ या सिनेमात पुन्हा एकदा आलिया भट्ट सोबत झळकणार आहे .


हे हि वाचा -RSS शी तुलना तालिबानशी करणे जावेद अख्तरना पडणार महागात, महानगर दंडाधिकारी न्यायालयात मानहानीची याचिका दाखल

First Published on: October 23, 2021 2:34 PM
Exit mobile version