रणवीरने शेअर केला अतरंगी फोटो, म्हणे ‘मी तर फुलदाणी’

रणवीरने शेअर केला अतरंगी फोटो, म्हणे ‘मी तर फुलदाणी’

रणवीरने शेअर केला अतरंगी फोटो, म्हणे 'मी तर फुलदाणी'

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग हा त्याच्या हटके स्टायलिश ड्रेसींग स्टाईलमुळे नेहमीत चर्चेत असतो. रणवीर सध्या त्याच्या एका फोटोमुळे चांगलाच चर्चेत आला आहे. फुलाफुलांचे रंगीत शर्ट घातलेला रणवीरचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फोटो शेअर करत रणवीरने त्या फोटोला एक भन्नाट कॅप्शनही दिले आहे. फ्लॅवर प्रिंटेट जॅकेट कम शर्ट आणि मरून रंगाची वेलवेट पॅन्ट असा अतरंगी फोटो शेअर करत रणवीरने ‘मी तर फुलदाणी’ असे मजेदार कॅप्शन फोटो देत फोटो शेअर केला आहे.

रणवीरने फ्लॉवर जॅकेट, वेलवेट पॅन्ट सोबत डोक्यावर Gucci नावाचा हेअर बॅंडही लावला आहे. त्यातच त्याने पिवळ्या रंगाचा ग्लासेसही लावले आहेत. ‘गुलदस्ता फ्लेक्स’ या रणवीरच्या कॅप्शन फोटोवर करण जोहर आणि बॉलिवूडच्या अनेक कलाकरांनी मजेदार कमेंट केल्या आहेत. अशा प्रकारचे फोटो पोस्ट करण्यासाठी हिम्मत लागते असे म्हणत काही युझर्सनी रणवीरचे कौतुकही केले आहे. खरंतर या आधीही रणवीरला त्याच्या विचित्र फॅशन स्टाईलमुळे ट्रोल करण्यात आले आहे. सोशल मीडियावर अनेक मिम्सही व्हायरल झाले होते. काही दिवसांपूर्वी रणवीर दीपिकासोबत राजस्थानला जाताना त्यांना एअरपोर्टवर पाहण्यात आले होते. तेव्हाही रणवीरने केलेल्या अजब गजब ड्रेस स्टाईलमुळे त्याला ट्रोल करण्यात आले होते.

रणवीर येत्या काळात ८३ या त्याच्या आगामी सिनेमात दिसाणार आहे. या सिनेमात रणवीरने कपिल देव यांची भुमिका साकारताना दिसणार आहे. ८३ सिनेमातही रणवीर एका वेगळ्या लुकमध्ये दिसणार आहे. त्याचबरोबर रोहित शेट्टीच्या सर्कस या सिनेमातही रणवीर दिसणार आहे.


हेही वाचा – नोबिता-शिजुकाचे झाले लग्न, चाहते झाले भावूक

 

First Published on: January 20, 2021 9:28 PM
Exit mobile version