‘गली बॉय’नंतर रणवीरसोबत पुन्हा एकत्र दिसणार आलिया!

‘गली बॉय’नंतर रणवीरसोबत पुन्हा एकत्र दिसणार आलिया!

'गली बॉय'नंतर रणवीरसोबत पुन्हा एकत्र दिसणार आलिया!

‘गली बॉय’नंतर पुन्हा एकदा अभिनेत्री आलिया भटसोबत रणवीर सिंग झळकणार आहे. गेल्या काही वर्षभरात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना चांगलीच रणवीर सिंगने चांगलीच भुरळ पाडली आहे. त्यानंतर रणवीर आणि आलिया त्यांच्या चाहत्यांना भेटायला लवकरच येणार असल्याची माहिती मिळतेय. करण जोहरने या दोघांना एकत्र आणण्याचे काम केले आहे, मात्र अद्याप या चित्रपटाची कोणतीही अधिक माहिती समोर आली नसली तरी या चित्रपटाची शुटिंग २०२१ मध्ये होणार असल्याची माहिती मिळतेय.

दरम्यान, गली बॉयमध्ये या दोघांचा अभिनय बघून चाहत्यांनी त्यांच्या कामाचे कौतुक देखील केले. तर या चित्रपटाच्या निमित्ताने चाहत्यांना पुढील वर्षी आलिया भट व रणवीर सिंग ही जोडी पुन्हा रुपेरी पडद्यावर पहायला मिळणार आहे.

मुंबई मिररने दिलेल्या माहितीनुसार, रणवीर आपल्या सर्व प्रोजेक्ट्सचे काम संपवून या चित्रपटाच्या शुटिंगच्या कामाला सुरूवात करणार आहे. शुटिंगच्या आधी २५ दिवसांचा एक वर्कशॉप अटेंड करणार आहे. आलिया भटदेखील यात सहभागी होणार आहे. चित्रपटाच्या शुटिंगला एप्रिल, २०२१मध्ये सुरूवात होण्याची शक्यता आहे. रणवीर सर्व व्यस्त शेड्यूल संपवल्यानंतर काही वेळासाठी ब्रेक घेणार आहे. तर संजय लीला भन्साळीचा आगामी चित्रपट गंगूबाई काठियावाडचे शूटिंग पूर्ण करून आलिया या चित्रपटाच्या शुटिंगमध्ये सहभागी होणार आहे.

प्रथमच झळकणार रणबीर-श्रद्धाची जोडी?

यासह अभिनेता रणबीर कपूर हा आपल्या आगामी ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात व्यस्त आहे. त्याला नुकताच चित्रपट निर्माता लव रंजन यांच्या कार्यालयाबाहेर पाहण्यात आले. यावेळी रणबीरसह श्रद्धा कपूरलाही लव रंजन यांच्या कार्यालयाबाहेर स्पॉट करण्यात आले. लव रंजन यांच्या अनटायटल्ड प्रॉजेक्‍टमध्ये रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांची जोडी प्रथमच झळकणार आहे.


सुपरहिट ‘द डर्टी पिक्चर’ मधील अभिनेत्रीचा संशयास्पद मृत्यू

First Published on: December 12, 2020 4:40 PM
Exit mobile version