रणवीरच्या अतरंगी स्टाईलवर होताहेत भन्नाट मीम व्हायरल

रणवीरच्या अतरंगी स्टाईलवर होताहेत भन्नाट मीम व्हायरल

रणवीरच्या अतरंगी स्टाईलवर होताहेत भन्नाट मीम व्हायरल

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग अभिनया व्यतीरीक्त त्याने केलेल्या अतरंगी स्टाईलमुळे जास्त लाइम लाइटमध्ये असतो. रणवीरने केलेल्या प्रत्येक लुकची चर्चा सोशल मीडियावर तसेच बी-टाउनमध्ये विशेष रंगताना दिसते. नुकतच रणवीरने केलेलं नवीन फोटोशूटचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. आणि हे फोटो व्हायरल होताच क्षणार्धातच सर्व नेटकऱ्यांच्या नजर रणवीरवर खिळल्या आहेत. रणवीरचा हा आगळा-वेगळा लूक पाहून सर्वांनाच नवल वाटत आहे. गळ्यात सोन्याची भलीमोठी चेन, पिवळ्या रंगाचा चष्मा, लांब केस आणि जॅकेट असा वैविध्यपुर्ण लुक रणवीरने कॅरी केला आहे. रणवीर नेहमीच त्याच्या लुक सोबत एक्सपीरिमेंट करत असतो. अनेकदा त्याला या फनी लुकमुळे नेटकऱ्यांच्या टिकेला देखिल सामोरे जावे लागते. आताही रणवीरच्या या लुक्सवर सोशल मीडीयावर प्रंचड मीम्स व्हायरल होत आहे. तर अनेक सेलिब्रिटींनी रणवीरच्या या भन्नाट लूकला पसंती दर्शवली आहे. आलिया भट, सिद्धार्थ जाधव, अर्जुन कपूर या कलाकारांनी त्याच्या फोटोंवर कमेंट्स केल्या आहेत.पण ट्रोलर्सच्या कमेंट्सकडे दुर्लक्षित करुन रणवीर स्वत:च्या मर्जीप्रमणाने नेहमी वागतांना दिसतो. सध्या रणवीरच्या या लुकवर मीम्स मेकरचा तुफान पाऊस बरसत आहे.

वर्क्रफंट बाबतीत सांगायचे झाल्यास लवकरच रणवीर सिंग. 83,सुर्यवंशम या बहुप्रतिक्षीत सिनेमात झळकणार आहे. कोरना व्हायरस दरम्यान अनेक कलाकारांनी सोशल मीडिया अकाउंटचा वापर लोकांची मदत तसेच जनजागृती करण्याकरिता केला होत. रणवीरने सुद्धा नुकतच काही दिवसांपासून सोशल मीडियावर त्याचे फोटो पोस्ट करण्यास सुरुवात करत धमाकेदार एंट्री केली आहे असे म्हणायला हरकत नाही.



हे हि वाचा – ‘वंडर वुमन’फेम गॅल गॅडोट तिसऱ्यांदा झाली आई, दिला गोंडस मुलीला जन्म



 

First Published on: July 1, 2021 11:45 AM
Exit mobile version