रॅपर श्रेयशचा शाही विवाह सोहळा, पहा फोटो

रॅपर श्रेयशचा शाही विवाह सोहळा, पहा फोटो

श्रेयश जाधव

‘आम्ही पुणेरी…’ असं म्हणत केवळ पुणेकरांना नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला ठेका धऱायला भाग पाडणारा रॅप गायक श्रेयश जाधवने खास फोटो शेअर केले आहेत.श्रेयश जाधव नुकताच लग्न बंधनात अडकला आहे. श्रेयशने आपले हे खास फोटो सोशलमिडीयावर शेअर केले आहेत. त्याच्या रॅप साँग प्रमाणेच त्याच्या या सुंदर फोटोलाही त्याचे चाहते भरभरून प्रतिसाद देत आहेत.

शाही विवाह सोहळा

‘नवीन सुरूवात’  या कॅप्शन खाली श्रेयसने हे फोटो शेअर केले आहेत. श्रेयस भाग्यश्री सुर्यवंशीसोबत आपला संसार सुरू करणार आहे. या नवदाम्पत्याला आशिर्वाद द्यायला मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी आणि राजकारणातील अनेक नामांकित मंडळींनी हा सोहळ्याला उपस्थित राहून आर्शिवाद दिले.

लग्नाचा शाही थाट

सध्या लग्नसमारंभामध्ये शॉर्टनावांची क्रेझ आहे. दीपवीर अर्थात दीपीका पदूकोन आणि रणवीर सिंग, विरूष्का म्हणजे विराट आणि अनुष्का शर्मा. ही नावांची क्रेझ आता मराठी कलाकारांमध्येही दिसून येत आहे. त्याचप्रमाणे श्रेयसने आपलं शॉर्ट नाव श्रेयाश्री असं ठेवलं आहे. त्यांचे हे फोटो पाहून राजेशाही थाटामाटात विवाह पार पडल्याचं लक्षात येतं. सध्या सोशल मीडियावर त्या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

श्रेयश्री

‘मी पण सचिन’ ठरला हीट

२०१९ हे वर्ष श्रेयशसाठी खास ठरलं हे नक्कीच. आजपर्यंत श्रेयसची रॅपर ही ओळख आता बदलली आहे. ‘मी पण सचिन’ या चित्रपटातून लेखक आणि दिग्दर्शक म्हणून आपण ओळख निर्माण केली आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला.

First Published on: March 4, 2019 6:16 PM
Exit mobile version