अभिनेत्री रिमा लागूची कन्या झाली लेखिका

अभिनेत्री रिमा लागूची कन्या झाली लेखिका

अभिनेत्री रिमा लागूची कन्या झाली लेखिका

मैने प्यार किया, आशिकी, हम आप के है कौन, कुछ कुछ होता है अशा गाजलेल्या हिंदी चित्रपटात साकारलेली आईची व्यक्तीरेखा आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. त्यांनी अधिकाअधिक हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि आता त्यांची मुलगी मृण्मयी लागू प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. “थप्पड, बस इतनी सी बात?” या सारख्या डायलॉगने तापसी पन्नू या अभिनेत्रीने आगामी चित्रपटातून लोकांच्या मनावर आपला गहिरा प्रभाव निर्माण केला आहे. दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांच्यासोबत या चित्रपटाचे कथानक मराठमोळी अभिनेत्री मृण्मयी लागू हिने लिहिले आहे. घरगुती हिंसेला सहन करू नका, असा महत्त्वपूर्ण संदेश या चित्रपटातून देण्यात आला आहे.


लवकरच चित्रपटातून येणार प्रेक्षकांच्या भेटीस

मृण्मयी लागू हे एक बहुआयामी व्यक्तिमत्व असून अभिनय, दिग्दर्शन आणि लेखन अशा सर्वच आघाड्यांवर तिने आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. “थप्पड़” ची कहाणी मुळापासून हलवून टाकणारी आणि विचार करायला प्रवृत्त करणारी असून तिचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे. थप्पडच्या निमित्ताने, निर्मात्यांनी एका महत्त्वाच्या विषयाला हात घातला आहे.

 

चित्रपटात तापसी पन्नू, रत्ना पाठक शाह, मानव कौल, दीया मिर्जा, तन्वी आज़मी आणि राम कपूर यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत. अनुभव सिन्हा आणि भूषण कुमार यांच्याद्वारे निर्मित असून या चित्रपटातून तापसी पन्नू लवकरच प्रमुख भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

First Published on: February 25, 2020 4:00 PM
Exit mobile version