जेष्ठ चित्रपट निर्मात्या सुमित्रा भावे यांचे निधन

जेष्ठ चित्रपट निर्मात्या सुमित्रा भावे यांचे निधन

जेष्ठ चित्रपट निर्मात्या सुमित्रा भावे यांचे निधन

सुप्रसिद्ध दिग्दर्शिका, निर्मात्या आणि पटकथालेखक, ज्येष्ठ चित्रपट निर्मात्या सुमित्रा भावे यांचं आज पुण्यात निधन झालं. त्या ७७ वर्षांच्या होत्या. देवराई, दोघी, दहावी फ अशा अनेक चित्रपटांच्या माध्यमातून सिनेसृष्टीत आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या सुप्रसिद्ध दिग्दर्शिका, निर्मात्या आणि पटकथालेखक सुमित्रा भावे यांची ओळख होती. दहावी फ, एक कप च्या, वास्तुपुरुष, संहिता, बाधा, नितळ, घो मला असला हवा, कासव, अस्तु असे अनेक मराठी चित्रपट व हिंदी लघुपटांचं दिग्दर्शन त्यांनी केलं होतं. सुमित्रा भावे यांच्या निधनामुळं पठडीबाहेरची वाट चोखाळणाऱ्या एका प्रतिभावंत दिग्दर्शिकेला गमावल्याची भावना सिनेसृष्टीत व्यक्त होत आहे.

सुमित्रा भावे या मराठी चित्रपट दिग्दर्शिका, निर्मात्या आणि पटकथालेखक म्हणून एकूण सुमारे १४ चित्रपट, ५०हून अधिक लघुपट आणि चार दूरचित्रवाहिनी मालिकांवर काम केले. या सर्व मालिकांचे लिखाण भावेंचे आहे. त्यांना अनेक आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाले आहेत. त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजातून पदवी घेतल्यावर पुणे विद्यापीठातून राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र या दोन विषयात एम.ए केले. शिवाय त्यांनी मुंबईच्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसची ग्रामविकास विषयाची पदविका मिळविलेली आहे. शिक्षण पूर्ण झाल्यावर भावे यांनी अनेक समाजसेवी संस्थांमध्ये विनामोबदला काम केले.

पुण्याच्या कर्वे विद्यापीठाच्या समाजसेवा संस्थेत दहा वर्षे प्राध्यापक आणि त्यानंतर सरकारप्रणीत कम्युनिटी अॅड अँड स्पॉन्सरशिपच्या त्या कार्यक्रम व्यवस्थापिका होत्या. सुमित्रा भावे यांच्या अनेक समाजकल्याणविषयक शोधपत्रिका प्रकाशित झाल्या आहेत. आकाशवाणीवर त्या वृत्तनिवेदिका होत्या. सुमित्रा भावे यांनी वयाची नुकतीच ७५ वर्षे पूर्ण केलेली आहे. आजही या वयात अतिशय धडाडीने त्या सिनेसृष्टीत कार्यरत आहेत. त्यांचे कार्य हे आजच्या पिढीसाठी अतिशय प्रेरणादायी आहे. त्याकरिता संयोजन समितीकडून सुमित्रा भावे यांच्या नावाचा विचार करण्यात आला आहे.


 

First Published on: April 19, 2021 9:09 AM
Exit mobile version