किम शर्मा आणि हर्षवर्धन राणेच्या नात्यात मिठाचा खडा

किम शर्मा आणि हर्षवर्धन राणेच्या नात्यात मिठाचा खडा

किम शर्मा आणि हर्षवर्धन राणेचे ब्रेकअप

मोहब्बते चित्रपटातून चर्चेत आलेली आणि नंतर अडगळीत गेलेली किम शर्मा चित्रपटांपेक्षा आपल्या अफेअरसाठीच प्रसिद्ध आहे. काही महिन्यांपूर्वीच तिने इन्स्टाग्रामवर एक फोटो टाकून हर्षवर्धन राणे सोबत सूत जुळल्याचे सांगितले होते. मात्र आता त्यांच्या नात्यात मिठाचा खड पडला असल्याची माहिती मिळत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता या दोन प्रेमी युगुलांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे.

मनोरंजन क्षेत्रातील गॉसिपनुसार किम आणि हर्षवर्षन यांच्यामध्ये मागच्या महिन्यात मोठा वाद झाला होता. त्यानंतर ते दोघेही एकमेकांशी बोलत नाहीयेत. सध्यातरी दोघांनी यावर मोकळेपणे काही सांगितले नसले तरी हर्षवर्धन राणेच्या माध्यम समन्वयकाने सांगितले की, हे दोघेही गेल्या काही दिवसांपासून एकत्र नाहीत.

डिसेंबर २०१७ साली किम आणि हर्षवर्धन पहिल्यांदा भेटले. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर एकमेकांचे फोटो टाकून आपले प्रेम जाहीर केले होते. तसेच अनेक ठिकाणी त्यांना एकत्र पाहण्यात आले होते. दोघे लंच आणि डिनरसाठीही अनेकदा दिसून आले होते.

पलटन या चित्रपटातून हर्षवर्धन राणे आपल्याला पाहायला मिळाला होता. हर्षवर्धनचे आडनाव मराठी वाटत असले तरी तो महाराष्ट्रात कधीच राहिलेला नाही. त्याचे आई-वडील हे आंध्रप्रदेशात राहायला होते. त्यामुळेच हर्षवर्धनने अनेक तेलगू चित्रपटात काम केलेले आहे. आपल्या प्रेमसंबंधाबाबत बोलताना हर्षवर्धन म्हणाला होता की, आमच्यात लपवण्यासारखं काही नव्हतं. आम्ही प्रत्येक ठिकाणी एकत्र दिसायचो. अर्थातच हे कामासाठी नव्हतं, त्यामुळे या नात्याबाबत काय बोलायचे, असा मला नेहमी प्रश्न पडतो.

दुसऱ्या बाजुला किम शर्मा आहे. २०१७ साली तिचा घटस्फोट झाला होता. केनयाच्या अली पंजानी नामक व्यापाऱ्याशी तिचे लग्न झाले होते. हर्षवर्धनशी सूत जुळण्याआधी प्रसिद्ध फॅशन डिझायनर अर्जुन खन्ना सोबतही तिचे नाव जोडले गेले होते.

First Published on: April 23, 2019 5:45 PM
Exit mobile version