कंटेंट क्वीन एकता कपूरच्या आगामी ‘ए कोल्ड मेस’मध्ये दिसणार फ्रेश जोडी!

कंटेंट क्वीन एकता कपूरच्या आगामी ‘ए कोल्ड मेस’मध्ये दिसणार फ्रेश जोडी!

कंटेंट क्वीन एकता कपूरच्या आगामी 'ए कोल्ड मेस'मध्ये दिसणार फ्रेश नवी जोडी!

कंटेंट क्वीन एकता कपूरने ‘ए कोल्ड मेस’ या आपल्या आगामी रोम-कॉम सीरिजच्या शूटिंगचे काही फोटोज पोस्ट केले तेव्हापासून, नेटिजन्सच्या उत्साहाला उधाण आले आहे. या सिरीजमध्ये रिद्धि डोगरा आणि बरुन सोबती ही जोडी पहिल्यांदाच मुख्य भूमिकेत अभिनय करताना एकत्र दिसणार आहेत. नवी जोडी, रिद्धि आणि बरुन– दोन वेब सुपरस्टार आता एका शोमध्ये, ऑल्ट बालाजीसाठी स्क्रीन स्पेस शेअर करणार आहेत. याची कथा एका अशा मुलाच्या भोवती फिरतो जो खूप विचार करतो आणि अशा एका मुलीला भेटतो जी खूप काही अनुभवते. ऑल्ट बालाजीने शूटच्या पहिल्या दिवसापासूनच काही इतर बीटीएस फोटोज देखील प्रसारित केले आहेत जे नेटिझन्सच्या पसंतीस उतरत आहेत.

‘ए कोल्ड मेस’ तनवीर बुकवाला यांच्या डिंग इन्फिनिटीद्वारा दिग्दर्शित करण्यात आली आहे. असे कळते की, ही सीरीज म्हणजे विशेष अशा मॉडर्न नातेसंबंधांवरची विस्मयचकित करणारी कहाणी आहे. शहरी एकटेपणाच्या कॉन्सेटसोबतच, ओल्ड स्कूल क्लासिक्स, फ्लिंग्स आणि प्रेमाच्या बदलत्या परिभाषेसोबत ही कहाणी दोन जीवांची एक सुंदर कथा सादर करते, जे दोन वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून येतात आणि रोमांसविषयी दोन टोकाच्या विचारांचे समर्थन करतात.

जरी, बरुण आणि रिद्धी मुख्य भूमिकेत दिसणार असले तरी इतर भूमिकांमध्ये कोणते कलाकार असणार आहेत, हे अजून गुलदस्त्यात आहे. ‘ए कोल्ड मेस’च्या आधी, बरुन ऑल्ट बालाजीच्या ‘द ग्रेट इंडियन डिसफंक्शनल फैमिली’मध्ये दिसला होता. तर, ऑल्ट बालाजीवर रिद्धि डोगराची ‘द मैरिड वुमन’ या वर्षीची जबरदस्त हिट ठरली होती. या दोघांचे हे आकर्षक फोटो त्यांच्यातील सुरेख केमिस्ट्री दाखवतात, जे इंटरनेटवर आग लावण्यास पूर्णपणे तयार आहेत. भारताचा कौटुंबिक ओटीटी प्लेटफॉर्म ऑल्ट बालाजी बैक-टू-बैक हिट शो देत असून त्यांची नुकतीच आलेली सीरिज कार्टेल एक ब्लॉकबस्टर बनली आहे आणि हल्लीच्या दिवसात सर्वाधिक बघितला जाणाऱ्या शो पैकी एक आहे.


First Published on: October 2, 2021 2:19 PM
Exit mobile version