ऋषभ शेट्टीच्या ‘कांतारा’ने रचला इतिहास; अमेरिकेत सुद्धा केली भरघोस कमाई

ऋषभ शेट्टीच्या ‘कांतारा’ने रचला इतिहास; अमेरिकेत सुद्धा केली भरघोस कमाई

अभिनेता ऋषभ शेट्टीचा कन्नड चित्रपट ‘कांतारा’ सध्या बॉक्स ऑफिसवर कल्ला करत आहे. या चित्रपटाने करोडोंची कमाई केली असून या चित्रपटाला प्रेक्षक भरघोस प्रतिसाद देऊ लागले आहेत. शिवाय हिंदी आणि इतर भाषेमध्ये देखील हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असलेले दिसून येत आहेत. कन्नडनंतर हिंदी आणि तेलुगूमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अवघ्या काही दिवसातच बॉक्स ऑफिसवर तूफान कमाई केली आहे.

कांताराने रचला इतिहास
‘कांतारा’ चित्रपटाने अमेरिकेच्या बॉक्स ऑफिसवर डॉलरमध्ये 1 मिलियन कमावले आहेत. अमेरिका बॉक्स ऑफिसवर 1 मिलियन डॉलर कमावणारा कांतारा’ चित्रपट कन्नड भाषेतील दुसरा चित्रपट आहे. तसेच या चित्रपटाला मिलियन क्लबमध्ये प्रवेश मिळाला आहे. यापूर्वी ‘KGF 2’ ने देखील अमेरिकेत 1 मिलियन डॉलर कमावले होते.

तीन आठवड्यात ‘कांतारा’ने कमावले इतके कोटी
‘कांतारा’ 30 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला होता. तीन आठवड्यात या चित्रपटाने जवळपास 156 कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाचे यश पाहता निर्मात्यांनी ‘कांतारा’ 14 ऑक्टोबर रोजी हिंदीमध्ये देखील प्रदर्शित केला.

कांतारा’ची कथा ऋषभ शेट्टीनं लिहीली असून तोच या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे आणि त्याने या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे. सोशल मीडियावरही ‘कांतारा’ ट्रेंडींगमध्ये अग्रेसर आहे. फक्त 16 कोटी रूपयांत बनलेल्या या सिनेमाने बजेट कधीच वसूल झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे मर्यादीत स्क्रिन्सवर रिलीज होऊनही ‘कांतारा’ भरघोस कमाई करतोय.

काय आहे ‘कांतारा’ची कथा?
‘कांतारा’ चित्रपटाची कथा ऋषभ शेट्टीने लिहिली असून चित्रपटात मुख्य भूमिका देखील त्यांनीच साकारली आहे. या चित्रपटाची कथा रहस्यमय आणि चित्तथरारक आहे. यामध्ये 1870 मधील काळ दाखवण्यात आला आहे.

 


हेही वाचा :

जॅकलिन माझ्यावर प्रेम करत होती, पण… सुकेश चंद्रशेखरने पत्रातून केला खुलासा

First Published on: October 23, 2022 2:28 PM
Exit mobile version