ऋषी कपूर यांचं दिल्लीतील ‘राजमा चावल’ आणि ‘चांदनी चौक’शी अनोखं नातं

ऋषी कपूर यांचं दिल्लीतील ‘राजमा चावल’ आणि ‘चांदनी चौक’शी अनोखं नातं

बॉलिवूड विश्व गेल्या 24 तासात 2 मोठ्या नावाजलेल्या कलाकारांना मुकलं आहे. इरफानने बुधवारी सकाळी जगाला निरोप दिला, त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ऋषी कपूर यांच्या निधनाची दुखःद बातमी समोर आली. दरम्यान या दोन्ही दिग्गज कलाकारांचं दिल्लीशी अनोखं नातं होतं. हा देखील योगायोगच आहे. जिथे इरफान खानने नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून अभिनयाचे बारकावे शिकल्यानंतर वर्षानुवर्षे दिल्लीत थिएटर केले, तर ऋषी कपूर यांच्या बर्‍याच चित्रपटांचे चित्रीकरण दिल्लीमध्येच झाले आहे. त्यापैकी ‘चांदनी’ हा मुख्य चित्रपट असून याखेरीज ऋषी कपूर तीन वर्षांपूर्वी दिल्लीतील चांदनी चौक भागात आपल्या ‘राजमा चावल’ या चित्रपटाच्या शूटिंगसाठी थांबले होते.

या काळात त्यांनी पुन्हा दिल्लीशी स्वतःला जोडून घेतले. ऋषी कपूर यांना जेव्हा ‘राजमा चावल’ या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान वेळ मिळाला, तेव्हा त्यांनी दिल्लीच्या काही भागाना आवर्जून भेट दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, बॉलिवूड अभिनेता ऋषी कपूर यांची बुधवारी रात्री अचानक तब्येत बिघडली आणि त्यानंतर त्यांना मुंबईतील एचएन रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयात दाखल करण्यात आलं. गुरुवारी सकाळी या लाखो हृदयावर राज्य करणाऱ्या अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनाची बातमी आणि पुन्हा बॉलिवूड विश्वात शोककळा पसरली.


Breaking : अभिनेते ऋषी कपूर यांचं निधन!
First Published on: April 30, 2020 10:39 AM
Exit mobile version