Video: रितेशने दुसऱ्यावर प्रेम असल्याचा जेनेलियासमोर केला खुलासा

Video: रितेशने दुसऱ्यावर प्रेम असल्याचा जेनेलियासमोर केला खुलासा

Video - लॉकाडाऊनच्या निमित्ताने रिेशने शेअर केला व्हीडिओ

बॉलिवूड मधील क्यूट कपल म्हणजे रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख. या क्युट कपलने काल ३ फेब्रुवारीला लग्नाचा वाढदिवस साजरा केला. ३ फेब्रुवारी २०१२ साली रितेश आणि जेनेलिया विवाहबंधनात अडकले. या दोघांच्या लग्नाला काल आठ वर्ष पूर्ण झाली. लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने या दोघांनी सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ शेअर केले होते. मात्र आज या दोघांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओ रितेश जेनेलियाला तो दुसऱ्यावर प्रेम करत असल्याचं सांगत आहे. त्यामुळे जेनेलियाला हे ऐकून धक्का बसला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ रितेश देशमुखने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये जेनेलिया रितेशवर खूप प्रेम असल्याचं सांगत आहे. मात्र रितेशने त्याचं प्रेम दुसऱ्यावर असल्याचं सांगितलं आहे. यावर जेनेलिया विचारते कोणावर तर मग रितेश बोलतो तुझ्या स्माईलवर.

रितेश आणि जेनेलियाचा हा फनी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रितेशने हा व्हिडिओ शेअर करताना लिहिलं की, ‘हा स्टंट घरी करू नका’ अशा इशारा त्याने दिला आहे. २००३ साली रितेशने ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटातून पदार्पण केलं. या सिनेमात जेनेलिया रितेशची हिरोईन होती. या चित्रपटादरम्यान दोघांमध्ये झालेल्या मैत्रीचं रुपांतर नंतर प्रेमात झालं.


हेही वाचा – म्हणून शिवराज म्हणतो ‘विकून टाक’!


 

First Published on: February 4, 2020 1:45 PM
Exit mobile version