Video: मराठी गायकांचं धमाल मॅशअप साँग

Video: मराठी गायकांचं धमाल मॅशअप साँग

सौजन्य- युट्यूब

संगीता आवडत नाही अशी असे लोक सापडणं कठीणच. गेल्या काही वर्षांत हिंदीसोबतच मराठी गाण्यांचा चाहता वर्गही खूप मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. मराठी संगीत क्षेत्रात होणाऱ्या नवनवीन प्रयोगांना संगीत प्रेमींची पसंती मिळते आहे. यातीलच एक प्रकार म्हणजे मॅशअप. विविध गाणी आणि गाण्यांच्याा चाली एकत्र करुन, त्यावर शब्द नवे-जुने शब्द रचून मॅशअप केले जाते. मॅशअपला बहुतांशीवेळी तरुणवर्गाची सर्वाधिक पसंती मिळते. मराठी भाषेतील असंच एक नवीन मॅशअप सध्या जोरदार ट्रेंड करतं आहे. मराठीतील नव्या दमाचा गायक रोहित राऊत आणि फेमस गायिका जुईली जोगळेकर यांनी एकत्र येत हे मॅशअप गायलं आहे. मराठीतील तोळा तोळा आणि हिंदीमधील दिल दिया गल्ला या दोन गाण्याचं हे धमाल मॅशप असून, सोशल मीडियावर रोहित आणि जुईलीच्या या नव्या मॅशपला मराठी प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळते आहे. तुम्हीही पाहा हे धमाल मॅशअप…

दोघं पुन्हा एकत्र

जुईली जोगळेकर आणि रोहित राऊत यांनी याआधी काही संगीत स्पर्धांमधून तसंच गाण्यांच्या कार्यक्रमांमधून एकत्र गाणी गायली आहेत. महाराष्ट्रभरात अनेक म्युझिक कॉन्सर्ट्समधून रोहित आणि जुईलीने लोकांना आपल्या आवाजाने मंत्रमुग्ध केले आहे. त्यामुळे रोहित-जुईलीच्या ड्युएट गाण्यांना कायमच लोकांनी पसंती दिली आहे. या नव्या मॅशअपच्या निमित्ताने हे दोघं पुन्हा एकत्र आले आहेत. या गाण्याच्या माध्यमातून दोघांनी पुन्हा एकदा आपल्या आवाजाची जादू लोकांवर केली आहे. या मॅशअपमुळे रोहित आणि जुईलीचे चाहते खुष झाले असणार हे नक्की.

या मॅशअपमधीस तोळा-तोळा हे गाणं संजय जाधवांच्या ‘तुही रे’ सिनेमामधील आहे. तर ‘दिल दिया गल्लां’ हे  गाणं सलमान खानच्या ‘एक था टायगर’ या सिनेमातील आहे.

 

First Published on: July 11, 2018 1:49 PM
Exit mobile version