महागुरूंच्या वडिलांची स्मृतिचिन्हे भंगारात; नोकरानेच केली चोरी

महागुरूंच्या वडिलांची स्मृतिचिन्हे भंगारात; नोकरानेच केली चोरी

अभिनेता सचिन पिळगावकर

प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांच्या ऑफिसमध्ये चोरी झाल्याचं उघडकीस आलं आहे. सचिन पिळगावकर यांनी आपल्या वडिलांची जतन करून ठेवलेली स्मृतिचिन्ह चोरीला गेली आहेत. या प्रकरणी पोलिसांनी त्यांच्या नोकराला अटक केली आहे.

गुरुवारी सकाळी सचिन पिळगावकर आणि त्यांची पत्नी आपल्या जुहू येथे असणाऱ्या ऑफिसमध्ये गेले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या ऑफसमध्ये रिनोव्हेशन चे काम सुरू होते. यावेळी ऑफिसमध्ये गेले असता त्यांना त्यांच्या वडिलांची स्मृतिचिन्ह दिसली नाहीत. यावेळी नोकराने त्यांना काम सुरू असल्यामुळे पोत्यात भरून ठेवली होती पण कामगारांनी दगड माती समजून टाकून दिली असतील असे सांगितले. हे ऐकताच क्षणी सचिन पिळगावक रानी पोलिसात धाव घेतली.

यावेळी सचिन यांनी आपला नोकर अमृत सोळंकी याच्यावर संशय व्यक्त केला. पोलिसांनी अमृतला ताब्यात घेऊन चौकशी केली असता. त्याने स्मृतिचिन्ह भंगारात विकल्याचे कबुल केले.

पोलिसांनी भरत सोळंकी विरोधात कलम ३८१ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सचिन पिळगावकर यांचे वडील शरद पिळगावकर यांनी अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे. सव्वाशेर, अष्टविनायक, चोरावर मोर, नाव मोठं लक्षण खोट अशा चित्रपटांचा समावेश आहे.

First Published on: October 3, 2019 10:29 PM
Exit mobile version