सईने चाहत्यांना केलं श्रमदानाचं आवाहन

सईने चाहत्यांना केलं श्रमदानाचं आवाहन

जागतिक वसुंधरा दिनाचे औचित्य साधून अभिनेत्री सई ताम्हणकरने आपल्या चाहत्यांना मातृभूमीसाठी श्रमदान करण्याचे आवाहन केलं आहे. १ में रोजी सई ताम्हणकर श्रमदान करायला जाणार आहे. आणि तिने आपल्या चाहत्यांनाही श्रमदानाचे महत्व पटवून देणारा एक व्हिडीयो सोशल मीडियावरून अपलोड केला आहे.

सई ताम्हणकर करते श्रमदान

अभिनेत्री सई ताम्हणकर म्हणते, “पाण्याअभावी रणरणत्या उन्हात तडफडणा-या गुराढोरांसाठी, पाण्याच्या शोधात बालपण हरवलेल्या लहान मुलांसाठी, डोक्यावर हंडे ठेवून पायपीट करणा-या बायकांसाठी, आणि करपणा-या शेतांसाठी मी ह्या महाराष्ट्रदिनी कुदळ-फावडे घेऊन श्रमदान करणार आहे. मी माझ्या पध्दतीने खारीचा वाटा उचलणार आहे. आपणही सहभागी व्हा.”

First Published on: April 23, 2019 2:26 PM
Exit mobile version