सलमान खानच्या हत्येचा कट रचणाऱ्या शार्पशूटरला अटक; बिश्नोई गँगचे कनेक्शन

सलमान खानच्या हत्येचा कट रचणाऱ्या शार्पशूटरला अटक; बिश्नोई गँगचे कनेक्शन

सलमान खानच्या हत्येचा कट रचणाऱ्याला अटक

बॉलिवूडचा भाईजान, दबंग खान अशा नावानी परिचित असलेल्या सलमान खान यांची हत्या करण्याचा कट पोलिसांनी उधळून लावला आहे. क्राईम ब्रँचने राहुल ऊर्फ सांगा ऊर्फ बाबा या गँगस्टरला अटक केली आहे. अटक केलेला मास्टरमाईंड राहुल यांनी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सलमान खानची वांद्रे मुंबईत रेकीही केली होती. याच कारणामुळे राहुल दोन दिवस बांद्र्यात वास्तव्यास होता, यावेळी त्याने पहारा ठेवला होता की, सलमान खान कधी घराबाहेर पडतो आणि तो कुठे जातो. मंगळवारी डीसीपी मुख्यालय राजेश दुग्गल यांनी पोलिस आयुक्त कार्यालयात पत्रकारांना ही माहिती दिली.

डीसीपी दुग्गल यांच्या म्हणण्यानुसार राहुल हा कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई गँगचा शार्प शूटर आहे. लॉरेन्स बिश्नोई सध्या जोधपूर राजस्थानच्या जेलमध्ये बंद आहे. डीसीपीने सांगितले की, सलमान खानच्या रेकीविषयी माहिती मिळाल्यानंतर राहुल यांनी लॉरेन्स बिश्नोई यांना कळविले होते. लॉरेन्स बिश्नोईचा सलमान खानवर राग होता. २०१८ मध्ये जोधपूरमधील पाडा हरिण शिकार प्रकरणात सलमान खानला निर्दोष सोडल्यामुळे लॉरेन्स दु:खी झाला होता. लॉरेन्सने सलमान खानला ठार मारण्याची धमकीही दिली होती.

 

तर पोलिसांचा विश्वास आहे की, लॉरेन्स आता सलमान खानची हत्या करण्याचा विचार करीत होता. त्यामुळे त्याने सलमान खानची रेकी राहुलद्वारे केली होती. राहुल याच्यावर केवळ फरीदाबादच नव्हे तर पंजाब, झज्जर, भिवानी येथेही खून आणि खंडणीचे खटले आहेत. गेल्या सहा महिन्यात राहुलने चार खून केले असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी राहुलकडून पिस्तूलही जप्त केले आहे.

आता पोलीस राहुलला कोर्टात हजर करणार असून त्याच्या रिमांडची मागणी करणार आहेत. २०१८ मध्ये प्रवीणने राहुल उर्फ सनीला बेकायदा शस्त्रे बाळगल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. त्याचा बदला घेण्यासाठी राहुल यांनी ही घटना घडवून आणल्याचे सांगितले जात आहे.


Birthday Special: गॅरेजमध्ये काम करणाऱ्या गुलजार यांची अशी झाली बॉलिवूडमध्ये एंट्री!
First Published on: August 19, 2020 9:18 AM
Exit mobile version