म्हणून दबंग खानने बदलले आपले नाव!

म्हणून दबंग खानने बदलले आपले नाव!

यंदा ईदला नाही तर दिवाळीमध्ये सलमान खान करणार ‘भाईजान’ रिलीज

बॉलिवूडचा दबंग खान अर्थात सलमान खानने आपलं नाव बदललं आहे. तुम्हालाही ऐकून धक्का बसला ना. पण हे खरं आहे. सलमनाने आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नावात बदल केला आहे. बॉलिवूडच्या या बाईजानचा लवकरच दबंग ३ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सलमानने खुद्द आपल्या ट्वीटर अकाऊंटचे नावही बदललं आहे. सलमानने आपल्या ट्वीटर हँडलला चुलबुल पांडे असे नाव बदलले आहे.

चुलबुल पांडे हे दबंग चित्रपटातील खूप गाजलेलं पात्र आहे. या पात्राने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं. याच नावाने सलमान आपलं ट्विटर हँडल वापरणार आहे. “नमस्कार, माझे नाव चुलबुल पांडे, तुम्हाला भेटुन आनंद झाला.” असे ट्विट करुन त्याने आपल्या नव्या नावाची माहिती चाहत्यांना दिली. सलमानच्या या नावाच्या ट्विटर हँडलला चाहत्यांनी खूप पसंती दिली आहे. या ट्विटला ५ हजाराहून अधिक चाहत्यांनी रिट्वीट केलं आहे. तर हजारो कमेंटस या ट्वीटला आल्या आहेत.

सध्या सलमानच्या या दबंग ३ ची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. या चित्रपटात त्याच्याबरोबर दिग्दर्शक, अभिनेते महेश मांजरेकारांची मुलगी सई मांजरेकर सलमानबरोबर मुख्य भुमिकेत आहे.

First Published on: October 3, 2019 5:49 PM
Exit mobile version