सलमान खानला ‘त्या’ गोष्टीची अजूनही लाज वाटते!

सलमान खानला ‘त्या’ गोष्टीची अजूनही लाज वाटते!

सलमान खान

सुपरस्टार सलमान खान त्याच्या सिनेमांमधून, जाहिरातींमधून किंवा रिअॅलिटी शोमधून कोट्यवधी रुपये कमवत असतो. त्याच्या बिग बॉस या रिअॅलिटी शोमधून तर तो कित्येक कोटींचा दररोज मालक होत असतो. पण, त्याच कोट्यधीश सलमान खानवर गेल्या ५ दशकांपासून सव्वा रुपयाचं कर्ज आहे, असं जर कुणी तुम्हाला सांगितलं, तर खरं वाटेल का? अर्थातच नाही. पण हे खरं आहे. खुद्द सलमान खाननंच याची कबुली दिली आहे. आणि ‘त्याची मला आजही लाज वाटते’, असं देखील सलमान खान म्हणाला आहे. नुकत्याच पार पडलेल्या पोलिसांच्या ‘उमंग २०२०’ या कार्यक्रमामध्ये सलमान खानने ही कबुली दिली आहे.

सलमान खानवर सायकल रिपेअरिंगची उधारी!

सलमान खानने या कार्यक्रमामध्ये आपल्या लहानपणीच्या काही गोष्टी उपस्थितांसमोर सांगितल्या. यातच, त्या उधारीविषयी सलमान खान बोलत होता. लहानपणी त्याच्या घराजवळच्या एका सायकलवाल्याची ही उधारी आहे. सलमान म्हणाला, ‘काही दिवसांपूर्वी मी आमच्या नेहमीच्या सायकलवाल्या काकांकडे गेलो होतो. पण जाताना मी हाफ पँट घातली होती. त्यात पैसे नव्हते. तेव्हा मी त्यांना म्हणालो, सायकल रिपेअर करून द्या, पैसे नंतर देतो. त्यावर ते सायकलवाले काका म्हणाले, तू लहानपणी देखील असाच होता. तेव्हाही माझ्याकडून सायकल रिपेअर करून घ्यायचास आणि पैसे द्यायचा नाहीस. अजूनही माझा सव्वा रुपया तुझ्यावर उधार आहे. हे ऐकून मलाच लाज वाटली’.

सलमान खान सध्या त्याच्या ‘राधे’ या सिनेमाचं शूटिंग करत आहे. या सिनेमामध्ये त्याच्यासोबत अभिनेत्री दिशा पटानी, जॅकी श्रॉफ आणि रणदीप हुडा मुख्य भूमिकेत आहेत.

First Published on: January 26, 2020 8:58 PM
Exit mobile version