दिलदार भाईजान; मुंबई पोलिसांसाठी १ लाख सॅनिटायझर्सचे केले वाटप

दिलदार भाईजान; मुंबई पोलिसांसाठी १ लाख सॅनिटायझर्सचे केले वाटप

सलमान खान (फाईल फोटो)

देशात कोरोना व्हायरसचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. चार हजारहून अधिक जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाचा फैलाव झपाट्याने वाढत आहे. म्हणून या कोरोना व्हायरसच्या संकटाला तोंड देण्यासाठी अनेक जण मदतीचा हात पुढे करत आहे. बॉलिवूडचा भाईजानने कोरोनाच्या संकटात पुन्हा एकदा मदतीचा हात पुढे केला आहेत. त्याने यावेळी मुंबईच्या फ्रंटलाईन योद्ध्यांसाठी पुढाकार घेतला आहे. नुकतेच सलमानने ‘FRSH’ स्वत:चे एक पर्सनल केअर ब्रँड लाँच केला आहे.

दरम्यान या नवीन ब्रँडच्या सहाय्याने त्याने कोरोना योद्ध्यांसाठी एक लाख सॅनिटायझर्स वाटप केले आहेत. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर सलमान खानवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून सलमानला या कौतुकास्पद पुढकारासाठी धन्यवाद दिले आहे.

सलमान या दिवसांमध्ये आपल्या पनवेल फार्महाउसवर आहे. जे लोकांसाठी अहोरात्र काम करत आहेत. त्यासाठी आता त्याने पुढाकार घेतला आहे. यापूर्वी त्यांने गावातील कामगार, मजूरांसाठी अन्नधान्याचे वाटप केले. बैलगाडी, पिकअप गाड्यांमधून सलमान खान यांनी अन्नधान्याचा साठा पाठवला. या योगदानात त्याला जॅकलिन फर्नांडिस, लुलिया, कमाल खानसारख्या कलाकारांची साथ लाभली. त्यामुळे आपल्या परोपकारी स्वभावामुळे सलमान खान लाखों लोकांच्या मनात आहे आणि याच कारणामुळे त्याच्या चाहत्यांची संख्या प्रचंड आहे.


हेही वाचा – पुन्हा तो धावून आला…केरळमध्ये अडकलेल्या १७७ मुलींना सोनूने सुखरूप पोहचवलं घरी!


 

First Published on: May 30, 2020 4:59 PM
Exit mobile version