मुंबई पोलीस अधिकाऱ्यांकडून सलमान खानला शस्त्रपरवाना मंजूर

मुंबई पोलीस अधिकाऱ्यांकडून सलमान खानला शस्त्रपरवाना मंजूर

सलमान खान गोळीबारप्रकरणी मोठी अपडेट समोर; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान आणि त्याच्या वडीलांना मागील काही दिवसांपूर्वी एका पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. तेव्हापासून सलमान आपल्या सुरक्षेबाबत खूप सावधान राहत असून त्याने स्वताःची सुरक्षा देखील अधिक वाढवली आहे. मीडिया रिपोर्ट्सच्या मते, सलमान खानने आपली सुरक्षा वाढवलेली आहे. ज्यासाठी त्याने त्याच्या कारला अपग्रेड केलेले आहे. आता तो लँड क्रूजरने जाईल जी बुलेटप्रूफ आहे. शिवाय सलमानने कारमध्ये आरमर सुद्धा लावलेले आहे आणि बुलेट प्रूफ ग्लास सुद्धा कारमध्ये लावण्यात आला आहे.

हत्यारांच्या लायसन्ससाठी मागणी
सलमान खानला जीवे मारण्याची धमकी मिळताच सलमानने स्वताःजवळ हत्यारं ठेवण्याची परवानगीचा अर्ज केला होता. तसेच त्याने सुरक्षेसाठी कार देखील अपग्रेड केली आहे. मुंबई पोलिसांच्या मते सलमानला धमकीचे पत्र मिळताच त्याने मुंबई पोलिस कमिश्नर ऑफिसमध्ये स्वताःची सुरक्षा करण्यासाठी हत्यारांच्या लायसन्स ठेवण्याची परवानगी मागितली होती. दरम्यान, आता त्याला पोलिस अधिकाऱ्यांनी सलमान खानला शस्त्र परवाना मंजूर केला.

दरम्यान, मागील काही महिन्यांपूर्वी पंजाब सरकारने सुरक्षा काढून घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी गायक सिद्धू मुसेवाला याची हत्या झाली होती. पूर्ववैमन्यस्यातून बिश्नोई गँगने त्याची हत्या केल्याचे समोर आले. दरम्यान, सलमान खानलाही हत्येची धमकी मिळाली होती. काळवीट शिकार प्रकरणात बिश्नोई गँगने त्याला धमकी दिली. काळवीट प्रकरणी सलमान खानने त्याच्या वडिलांसोबत सर्वांसमोर येऊन जाहीर माफी मागावी अशी मागणी बिश्नोई गँगने केली होती. तसे न झाल्यास सलमान खानला ठार मारण्याची धमकी दिली होती.

हत्येचा फसला होता प्रयत्न

दरम्यान, लॉरेन्स बिश्नोईने २०१८ मध्ये सलमान खानच्या हत्येसाठी सर्व तयारी केली असल्याचाही खुलासा नुकताच आला होता. त्याच्या हत्येसाठी बिश्नोईने चार लाखांचं एक खास रायफलही खरेदी केलं होतं. यासाठी त्याने संपत नेहरा याला नेमलं होतं. संपत नेहरा सलमानच्या हत्येसाठी मुंबईतही आला होता. नेहराने सलमानच्या मुंबईच्या घराची रेकी केली. या रेकीदरम्यान त्याला जाणवलं की हत्येसाठी लांबंच लक्ष्य हेरणारी रायफल गरजेची आहे. त्यामुळे त्यावेळी हल्ला होऊ शकला नाही.


हेही वाचा :सलमान खानने घेतली मुंबई पोलीस आयुक्तांची भेट, शस्त्राच्या परवान्यासाठी केला अर्ज?

First Published on: August 1, 2022 11:36 AM
Exit mobile version