आणि…’रेस’मध्ये सलमान जिंकला

आणि…’रेस’मध्ये सलमान जिंकला

अभिनेता सलमान खान

आपल्या भूमिकेसाठी असो वा खऱ्या आयुष्यात फिटनेसकडे योग्य तऱ्हेने लक्ष देणारा म्हणूनदेखील सलमान खान प्रसिद्ध आहे. सलमान सध्या ५२ वर्षांचा असला तरीही तरूणाला लाजवेल असा उत्साह त्याच्या कामातून दिसून येतो.सलमान आपल्या प्रत्येक चित्रपटासाठी योग्य प्रकारे प्रशिक्षण घेतो आणि त्यानंतरच त्या भूमिकेला न्याय देतो. तुम्हाला वाटत असेल आता नक्की हे सगळं कशासाठी? तर सध्या घोड्याबरोबर लावलेल्या शर्यतीचा सलमानचा व्हिडिओ व्हायरल होतो आहे.

काय आहे व्हायरल व्हिडिओत?

या व्हिडिओमध्ये घोड्याबरोबर सलमाननं रेस लावल्याचं दिसत आहे. त्याच दमानं सलमान घोड्याच्या वेगानं धावत आहे. इतकंच नाही तर घोड्याला हरवल्यानंतर सलमानच्या चेहऱ्यावरचा आनंददेखील या व्हिडिओमध्ये कैद झाला आहे. हा व्हिडिओ सलमानखानप्लॅनेट या इन्स्टा अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आला असून ‘उपर अल्लाह नीचे धरती बीच में तेरा जुनून’ हे ‘सुलतान’ चित्रपटातील गाणं जोडण्यात आलं आहे. त्यामधून सलमानची जिद्द आणि उत्साह दोन्ही दिसून येत आहे. सलमनानं या वयातदेखील योग्य तऱ्हेनं स्वतःचा फिटनेस राखून ठेवला आहे.

सध्या सलमान खान व्यस्त

नुकताच यावर्षी ईदला सलमानचा ‘रेस ३’ प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. तर दबंग टूरवरून परत आल्यानंतर ‘भारत’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे. त्याबरोबच दुसऱ्या बाजूला ‘दबंग ३’चंदेखील चित्रीकरण सलमान करणार असून त्याचा ‘दस का दम’ हा रियालिटी शो सध्या गाजत आहे. तर रेमो डिसुझाबरोबर एका डान्स चित्रपटासाठीदेखील बोलणी सुरु असून सलमान या चित्रपटात काम करण्यासाठी नृत्याचं प्रशिक्षण सध्या घेत आहे.

 

First Published on: June 22, 2018 2:10 PM
Exit mobile version