प्रसुतीनंतरही हॉट दिसणार का? विचारणाऱ्या फॅन्सला दिले समीराने असे प्रत्योत्तर

प्रसुतीनंतरही हॉट दिसणार का? विचारणाऱ्या फॅन्सला दिले समीराने असे प्रत्योत्तर

अभिनेत्री समीरा रेड्डी

बॉलिवूडमध्ये फार कमी काळ मात्र आपल्या कामाने ओळख निर्माण करणारी समीरा रेड्डी दुसऱ्यांदा आई होणार आहे. समीराने आपल्या गरोदर पणाचे फोटो सोशल मीडियावर टाकले होते. या फोटोंना तिच्या फॅन्सनी चांगला प्रतिसाद दिला. मात्र काही जणांनी तिला या फोटोंवरून ट्रोल केले. फोटोवरून ट्रोल करणाऱ्यांना समीराने कडक शब्दात प्रत्युत्तर दिले आहे. मुसाफिर चित्रपाटतून समीराला बॉलिवूडमध्ये ओळख मिळली. मुसाफिर चित्रपटात तिच्या भूमिकेला लोकांनी पंसती दाखवली होती. यानंतर तिने काही बॉलिवूड चित्रपट केले होते यामध्ये टॅक्सी नंबर ९२११, नो एंट्री, वन टू थ्री आणि दे दना दन हे चित्रपट सामिल आहेत.

काय आहे प्रकरण

चित्रपटांमध्ये समीरा ही तिच्या बोल्ड भूमिकांसाठी ओळखली जात होती. समीराने चित्रपटांमध्ये अनेक बोल्ड सीन्स केले आहेत. समीरा ही सध्या गरोदर आहे. तिने आपले फोटो सोशल मीडियावर टाकले होते. यानंतर तिला ट्रोल करण्यात आले होते. प्रसुतीनंतरही समीरा हॉट दिसते असा प्रश्न एकाने विचारला केला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून समीराने लिहिले की,”तुम्हीही तुमच्या आईच्या पोटातूनच जन्म घेतला असेल. बरोबर ना? आईने जन्म दिल्यानंतर ती हॉट दिसते की नाही असे तुम्ही आईला विचारता का? प्रसुतीनंतरही फीट राहाण्यासाठी सर्वेच जण करीना कपूर नसतात.”

First Published on: March 12, 2019 4:14 PM
Exit mobile version