Samrat Prithviraj Tax Free: UP नंतर ‘या’ दोन राज्यातही ‘सम्राट पृथ्वीराज’ टॅक्स फ्री करण्याची घोषणा

Samrat Prithviraj Tax Free: UP नंतर ‘या’ दोन राज्यातही ‘सम्राट पृथ्वीराज’ टॅक्स फ्री करण्याची घोषणा

यूपीचे मुख्यंत्री योगी आदित्यानाथ यांनी गुरूवारी २ मे रोजी आपल्या संपूर्ण कॅबिनेट मंत्र्यांसोबत बसून ‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपट पाहिला.लखनऊ मधील लोक भवनामध्ये या चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग दाखवण्यात आले. यावेळी तिथे चित्रपटाचे दिग्दर्शकांसोबत अभिनेता अक्षय कुमार आणि मानुषी छिल्लर सुद्धा उपस्थित होते. चित्रपट पाहिल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांनी आपल्या राज्यात ‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपट टॅक्स फ्री करण्याची घोषणा केली.

यूपीमध्ये होणार टॉक्स फ्री


‘सम्राट पृथ्वीराज’ यांच्या जीवनावर आधारित असलेल्या या चित्रपटात ‘सम्राट पृथ्वीराज’ यांच्या आयुष्यातील संघर्ष आणि शौर्य दाखवण्यात आले आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन चंद्रप्रकाश यांनी केले असून या चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत असून मानुषी छिल्लरने सुद्धा महाराणी संयोगिता ही भूमिका साकारली आहे. २ जून रोजी हा चित्रपट मुख्यमंत्री योगी आणि त्यांच्या मंत्री मंडळाने लोक भवनातील ऑडिटोरिममध्ये पाहिला आणि यूपीमध्ये हा चित्रपट टॅक्स फ्री करत असल्याची घोषणा केली.

यूपीनंतर मध्यप्रदेश आणि उत्तराखंडमध्ये देखील होणार टॉक्स फ्री

 

चित्रपट रिलीज होण्याआधी अनेकदा वादाच्या कचाट्यात
‘सम्राट पृथ्वीराज चित्रपटाची घोषणा झाल्यापासून या चित्रपटाला अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. याआधी या चित्रपटाचे ‘पृथ्वीराज’ असे नाव होते त्यावेळी राजस्थान मधील काही संघांकडून या चित्रपटाचे नाव बदलण्याचे आदेश देण्यात आले. मात्र जर या चित्रपटाचे नाव बदलले नाही तर हा चित्रपट राजस्थानमध्ये प्रदर्शित होऊ दिला जाणार नाही असे सांगण्यात आले. त्यानंतर २७ मे रोजी या चित्रपटाचे नाव ‘सम्राट पृथ्वीराज’ असे करण्यात आले.

‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपट ३ जून रोजी प्रदर्शित होणार असून या चित्रपटामध्ये अक्षय कुमार मुख्य भूमिकेत दिसणार आहे. शिवाय मानुषी छिल्लर सुद्धा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ‘सम्राट पृथ्वीराज’ हिंदी भाषेसह तमिळ आणि तेलगू भाषेत सुद्धा प्रदर्शित होणार आहे.

 


हेही वाचा :http://Akshay Kumar च्या ‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपटाला मोठा धक्का; ‘या’ देशांमध्ये चित्रपटावर…

First Published on: June 3, 2022 9:14 AM
Exit mobile version