डोंबिवली माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे – संदीप कुलकर्णी

डोंबिवली माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे – संदीप कुलकर्णी

डोंबिवली माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे - संदीप कुलकर्णी

आजच्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ‘डोंबिवली रिटर्न’ या चित्रपटाचा नायक अनंत वेलणकर अर्थात संदीप कुलकर्णी यांनी डोबिंवली रेल्वे स्टेशनवर झालेल्या ध्वजारोहण सोहळ्यामध्ये विशेष उपस्थिती लावली. चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक महेंद्र तेरेदेसाई निर्माते महेंद्र अटोले डोंबिवली रेल्वे स्टेशनचे स्टेशन मास्तर, सहायक स्टेशन मास्तर, रेल्वे प्रवाशी संघटना, जनरल रेल्वे पोलीस, रेल्वे प्रोटेक्शन फोर्स, उपस्थित होते. त्याशिवाय महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकलने दररोज प्रवास करणारे सर्वसामान्य नागरिकही यावेळी उपस्थित होते.

डोंबिवलीशी जवळचा संबंध

‘नियतीने जशा गोष्टी जुळून येतात, अगदी तसाच योग खरंतर आज जुळून आला आहे. माझा डोंबिवलीशी जवळचा संबंध आहे. माझे मित्र-नातेवाईकही डोंबिवलीमध्ये राहतात. असं कधी वाटलं नव्हतं कि, माझ्या कलाकृतीच्या निमित्ताने मी डोंबिवलीचा एवढा मोठा भाग होईन. डोंबिवली हा माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. आजचा हा दिवस अभिमान, कृतज्ञता व्यक्त करण्याचा आहे. प्रवाशांना विविध सेवा देताना आपले सर्वस्व पणाला लावणाऱ्या रेल्वेच्या विविध विभागातील लोकांसोबत हा दिवस साजरा करावासा वाटला, यासाठी मी इकडे आलो’, अशी भावना संदीप कुलकर्णी यांनी यावेळी व्यक्त केली.

हेही वाचा – ‘डोंबिवली रिटर्न’चा थरारक टिझर, तुम्ही पाहिलात?

असा आहे ‘डोंबिवली रिटर्न’

‘डोंबिवली रिटर्न’ या चित्रपटात संदीप कुलकर्णी यांनी सर्वसामान्य नोकरदाराची भूमिका केली आहे. अनंत वेलणकर हा लोकलमधून धक्के खात रोज प्रवास करत असतो. त्याच्या आयुष्यातल्या एका घटनेमुळे काय घडतं? याचं चित्रण या चित्रपटात करण्यात आलं आहे. करंबोला क्रिएशन्सची निर्मिती असलेला, महेंद्र तेरेदेसाई दिग्दर्शित हा चित्रपट २२ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.

First Published on: January 26, 2019 5:00 PM
Exit mobile version