संग्राम समेळने का हाती घेतली काठी?

संग्राम समेळने का हाती घेतली काठी?

Sangram Samel

स्टार प्रवाहवरील ‘ललित 205’ या मालिकेत नील राजाध्यक्षची भूमिका साकारणार्‍या संग्राम समेळने मालिकेत नुकताच एक फायटिंग सीक्वेन्स शूट केला. खास बात म्हणजे गुंडांशी दोन हात करण्याचा हा सीन त्याने पहिल्याच प्रयत्नात पूर्ण केला. फायटिंग सीक्वेन्स साकारताना संग्रामच्या कामी आला तो त्याचा अनुभव. पारंपरिक साहसी खेळ समजला जाणार्‍या लाठीकाठी खेळाचं संग्रामने प्रशिक्षण घेतलंय. विजय माने यांच्या मार्गदर्शनाखाली गेली 2 वर्ष तो याचं प्रशिक्षण घेतोय. आवड जोपासण्यासाठी त्याने लाठीकाठी शिकण्याचा ध्यास घेतला आणि तो चिकाटीने पूर्णही केला. मालिकेत जेव्हा फायटिंग सीक्वेन्स करणार असल्याची माहिती मिळाली तेव्हा हाच अनुभव संग्रामच्या कामी आला आणि त्याने सीन उत्तमरित्या साकारला. या सीनविषयी सांगताना संग्राम म्हणाला, ‘मी लाठीकाठी शिकल्यामुळे सीन करणं मला खूप सोपं गेलं. मी सर्‍हाईतपणे मारामारीचा सीन केला मात्र माझ्यासमोर उभ्या ठाकलेल्या गुंडांची पळता भुई थोडी झाली कारण त्यांना काठीचा खरोखरच फटका बसेल की काय याची भीती होती. सीन ओके होताच सर्वांनीच माझं भरभरुन कौतूक केलं.’ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री 8.30 वाजता फक्त स्टार प्रवाहवर पाहता येईल.

First Published on: November 27, 2018 4:43 AM
Exit mobile version