पाहा ‘सानिया मिर्झा’च्या मुलाची झलक

पाहा ‘सानिया मिर्झा’च्या मुलाची झलक

प्रातिनिधिक छायाचित्र

भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक यांना गेल्या महिन्यात मुलगा झाला.बेबी मिर्झा मलिकचे त्यांनी स्वागत केले. या जोडप्याने त्यांच्या मुलाचे नाव ‘इझान मिर्झा मलिक’ ठेवले आहे. १२ एप्रिल २०१० रोजी सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांचा विवाह झाला होता. सध्या त्यांच्या जीवनात एक नवीन अध्याय सुरु झाला आहे ते दोघेही त्याचा आनंद घेत आहेत.

२००५ मध्ये डब्ल्यूटीए टूर्नामेंट सिंगल्स टायटल जिंकणारी पहिली भारतीय टेनिसपटू सानिया, हिने काल सोशल मीडियावर तिच्या चिमुकल्याबाळाचा फोटो शेअर केला. सानियाने ट्विटरवर तिचा आणि तिच्या बाळाबरोबरचा एक प्रेमळ क्षण शेअर केला. त्या फोटो बाळ एका ब्लॅन्केट मध्ये आहे, ज्यावर त्याचे नाव ‘इझान’ हे लाल अक्षरात लिहिलेले आहे. आईच्या कुशीत अगदी प्रेमळपणे ते गोंडस बाळ झोपलेले आहे. सानियाने कॅप्शन लिहिले की “#Moments #Allhamdulillah”.

शोएबने आपल्या फॅन्स सोबत त्याच्या बाळाच्या जन्माची बातमी ट्विटरवर शेअर केली होती. बेबी मिर्झा मलिकचे आगमन झाले आहे असे त्याने कळवले होते. #BabyMirzaMalik असे त्याने ट्विट केले होते.

इझानच्या जन्मानंतर पाचव्या दिवशीच सानियाने Instagram वर अतिशय भावूक असा संदेश लिहिला होता. त्यात शोएब क्रिकेटमुळे बाहेर आहे असे तिने सांगितले. आणि आई झाल्यावर तिला एक टूर्नामेंट खेळल्यासारखेच वाटत होते असेही ती म्हणाली.

माजी डबल्स वर्ल्ड नंबर १ सानिया मिर्झा ही ऑक्टोबर २०१७ पासून टेनिस पासून दूर होती. सहा ग्रँड स्लॅम दुहेरी स्पर्धांचे विजेतेपद तिने मिळवले आहे. आता ती २०२० च्या टोकियो ऑलिंपिकसाठी खेळण्याची इच्छा व्यक्त केली.

First Published on: November 22, 2018 4:34 PM
Exit mobile version