कर्करोगावर मात करून संजय दत्तचे कमबॅक; केजीएफ:२ चं शूटिंग सुरू

कर्करोगावर मात करून संजय दत्तचे कमबॅक; केजीएफ:२ चं शूटिंग सुरू

बॉलिवूड विश्वातील अभिनेता संजय दत्त गेल्या काही महिन्यांपासून कर्करोगाने ग्रस्त होता. त्यामुळे संजय दत्त चांगलाच चर्चेत होता. मात्र या कर्करोगावर मात करून संजय दत्तने पुन्हा एकदा कमबॅक केले आहे. संजय दत्तने त्याचा आगामी चित्रपट ‘केजीएफ: चॅप्टर २’ या चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात केली आहे. सध्या तो हैदराबादमध्ये चित्रपटाचा हिरो यशसोबत चित्रपटातील काही सीन शूट करत आहे. या शुटिंगमध्ये क्लायमॅक्सच्या सीनसह अनेक स्टंट आणि फाइट सीनदेखील असणार आहेत. दरम्यान या ठिकाणीच ‘केजीएफ: चॅप्टर २’ चित्रपटाते शुटिंग पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

या चित्रपटात दक्षिणात्य कलाकारांसह बॉलिवूडमधील अनेक कलाकार देखील बघायला मिळणार आहे. दरम्यान, या चित्रपटाची अनेक पोस्टर्स सोशल मीडियाद्वारे प्रसिद्ध झाले आहेत. या चित्रपटातील अभिनेता यश आणि संजय दत्त तसेच अभिनेत्री रवीना टंडन यांचा लूक समोर आला आहे. ‘केजीएफ: चॅप्टर २’ मध्ये अभिनेता संजय दत्त या चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटात तो अधीरा हे पात्र साकारणार आहे.

केजीएफ चॅप्टरच्या दुसरा भागाचा आवाका पहिल्या भागापेक्षाही अधिक मोठा असेल असे अभिनेता यशने सांगितले होते. हा चित्रपटही पहिल्या भागाप्रमाणेच हिंदी, तामिळ आणि कन्नड या तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘केजीएफ: चॅप्टर २’ मध्ये संजय दत्त, रवीना टंडन, यश यांच्यासारखे कलाकार मुख्य भूमिकेत असतील.यशचा चित्रपट ‘केजीएफ चॅप्टर २’ हा २०२१ चा बहुप्रतिक्षित चित्रपट आहे.


‘या’ आगामी हॉलिवूडपटात निक-प्रियांका एकत्र स्क्रीन शेअर करणार
First Published on: December 10, 2020 4:20 PM
Exit mobile version