Video: लॉकडाऊनमध्ये सपना चौधरीला फॅन्सची आठवण, ‘हा’ व्हीडिओ झाला व्हायरल!

Video: लॉकडाऊनमध्ये सपना चौधरीला फॅन्सची आठवण, ‘हा’ व्हीडिओ झाला व्हायरल!

सपना चौधरी

सध्या लॉकडाऊनमुळे सगळेच घरात बसून आहेत. शुटींग इतर कार्यक्रमबंद असल्यामुळे सगळे कलाकार घरातच बसून आहेत. इतर कलाकारांप्रमाणे सपना चौधरीही सध्या घरातच आहे. सपना जरी घरातच असली तरी ती सोशल मीडियावर अक्टीव्ह आहे. ती नेहमी आपल्या डान्सचे व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. सध्या सपनाने शेअर केलेला डान्सचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भोजपूरी, पंजाबी, हरियाणा गाण्यांवर धम्माल करणारी सपना या गाण्यात स्टेजवर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे.

 

हा व्हीडिओ शेअर करताना सपना चौधरीने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, सपना म्हणते की मला माझे व्हीडिओ बघताना मला तुमची खूप आठवण येत आहे. मी खूप खूष आहे. तुम्हीही तुमच्या कुटुंबाबरोबर जूने फोटो, व्हीडिओ बघा, जून्या आठवणींना उजाळा द्या. आणि एकत्र खूष रहा. घरातील मोठ्या व्यक्तींची काळजी घ्या. ही परिस्थीती कठीण आहे. यातून नक्की मार्ग निघेल.

सपना चौधरी आपल्या कुटूंबाबरोबर वेळ घालवताना आपल्या फॅन्सला अजिबात विसरलेली नाहीये. तीने आपले व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर करत फँन्सची आठवण काढली आहे. सपना चौधरीने आपल्या करिअरची सुरूवात हरियाणाच्या ऑर्केस्ट्रापासून केली होती. तीने करिअरची सुरूवात रागनी कलाकारांबरोबर काम करून केली. त्यानंतर तीने स्टेज जान्सला सुरूवात केली आणि तीने कधी मागे वळून बघितलच नाही. सपना बिग बॉस ११मध्ये स्पर्धक म्हणून होती. एवढच काय तर बॉलिवूडच्या अनेक गाण्यांमध्ये सपनचा डान्सचा जलवा सगळ्यांनीच बघितला आहे.

First Published on: April 27, 2020 9:36 AM
Exit mobile version